Viral video: अद्ययावत तंत्रज्ञानामुळे जग झपाट्यानं बदलत आहे. कालपर्यंत लोक रोख रकमेत व्यवहार करत होते. पण आता ऑनलाईन ट्रान्झेक्शन, फोन पे, गुगल पे, पेटीएम यांसारख्या अॅप द्वारे आर्थिक व्यवहार होऊ लागले आहेत. आता लोकच इतके स्मार्ट झालेत, तर रस्त्यावर भीक मागणारे भिकारीही यात मागे नाहीत. मात्र आता त्यांच्याबरोबरच तृतीयपंथियांनीही हा फंडा वापरायला सुरुवात केली आहे. बंगरुळमधला एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तृतीयपंथी स्त्याने जाणाऱ्या लोकांकडून क्यूआर कोड दाखवून पैसे घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे जेव्हा लोकांनी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्याने क्यूआर कोडद्वारे पैसे देण्यास सांगितले.ही शैली लोकांना खूप आवडली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हा व्हिडिओ एक्सवर ऋषी बागरी नावाच्या युजरने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने ‘डिजिटल व्यवहाराची उंची’ असे कॅप्शन लिहिले आहे. ट्रॅफिक सिग्नलला थांबताच एक तृतीयपंथी दुचाकी चालकाकडे जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर तो पैशाची मागणी करतो. यावेळी दुचाकीस्वार सुट्टे पैसे नसल्याचं कारण देतो. हे एकून तृतीयपंथी लगेच त्याला क्यूआर कोडचा पर्याय देतो आणि डिजिटल पेमेंट मागतो. दुचाकीस्वार डिजिटल पेमेंट करतो आणि नंतर निघून जातो. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बापरे! केवढे ते धाडस; तरुणानं १२ फूट लांब किंग कोब्राला केलं किस अन्…पाहा थरारक Video
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘माझ्यासोबत असे रोज घडते, जेव्हा मी सिग्नलवर थांबतो तेव्हा ते QR कोड घेऊन येतात.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘आता लोक शिक्षित होत आहेत.