मनातले शब्द हळूहळू पेनाच्या सहाय्याने कागदावर उतरू लागलात. कधी या पेनाने कागदावर लिहलेल्या शब्दांची कविता होते तर कधी लेख, कधी कथा. याच पेनाने उभ्या आडव्या रेघोट्या मारल्या तर त्यातून एखादे सुंदर चित्र पण तयार होते. पण एका पेनाने ओढलेल्या रेषांतून विद्युत धारा देखील वाहू शकते याची तुम्ही साधी कल्पनाही केली नसेल. पण ही किमया प्रत्यक्षात साकारली आहे ती जपानच्या एका कंपनीने. जपानच्या एका कंपनीने असे पेन बनवले आहे ज्याने कागदावर रेघोट्या मारल्या तर त्या रेषांतून विद्युत प्रवाह सुरू होतो. जपानची विद्युत उपकरणे बनवणारी कांडेको कंपनी आणि टोकियो विद्यापीठ या दोघांनी एकत्रितरित्या हा पेन बनवला आहे. या पेनाच्या शाईत खास प्रकारचे विद्युत प्रवाह करणारे कण वापरले आहेत. तसेच या पेनाचा वापर करण्यासाठी खास प्रकारच्या कागदाचाही वापर केला गेला आहे. सर्किट बनवण्यासाठी या पेनाचा वापर केला जात आहे.  कंपनीने या पेनाचा व्हीडिओ देखील प्रदर्शित केला आहे. ज्यात पेनाने ओढलेल्या रेषा जोडून छोटे बल्ब कसे पेट घेतात हे दाखवले आहे. या पेनाने कागदावर ओढलेल्या रेघोट्या खोडण्यासाठी विशिष्ट प्रकराचा खोडरबर देखील बनवला आहे.  आतापर्यंत थ्रीडी पेन, मॅजिक पेन असे अनेक प्रकारचे पेन बाजारात आले आहेत पण हे पेन नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल.

Negative reactions of Nagpurkars on the new experiment of traffic No Right Turn
‘नो राईट टर्न’: वाहतुकीच्या नव्या प्रयोगावर नागपुरकरांची प्रतिक्रिया, हा तर ‘नाकापेक्षा मोती जड’!
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Rumours of bombs due to science experiments police got confuse
विज्ञानाचा प्रयोग, बॉम्बची अफवा अन् पोलिसांची तारांबळ, काय घडले नेमके?
Encroachment by food vendors is a serious problem on Mate Chowk to IT Park road
खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या अतिक्रमणाला आशीर्वाद कोणाचे? माटे चौक ते आयटी पार्क रस्त्याची समस्या गंभीर
Smart insulin
Diabetes ‘Smart’ Insulin:मधुमेहाच्या रुग्णांसाठी आता ‘स्मार्ट’ इन्सुलिन; काय सांगते नवीन संशोधन?
Loksatta vasturang Important difference between apartment and housing association and its implications
अपार्टमेंट आणि गृहनिर्माण संस्था महत्त्वाचा फरक आणि त्याचे परिणाम!
Pharmacy, management courses hit , Pharmacy,
प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन अभ्यासक्रमांना फटका
viscose fabric
विश्लेषण: ‘विस्कोस’ कापड खरेच पर्यावरणपूरक असते का? पर्यावरणवाद्यांकडून वेगळेच निष्कर्ष?