मनातले शब्द हळूहळू पेनाच्या सहाय्याने कागदावर उतरू लागलात. कधी या पेनाने कागदावर लिहलेल्या शब्दांची कविता होते तर कधी लेख, कधी कथा. याच पेनाने उभ्या आडव्या रेघोट्या मारल्या तर त्यातून एखादे सुंदर चित्र पण तयार होते. पण एका पेनाने ओढलेल्या रेषांतून विद्युत धारा देखील वाहू शकते याची तुम्ही साधी कल्पनाही केली नसेल. पण ही किमया प्रत्यक्षात साकारली आहे ती जपानच्या एका कंपनीने. जपानच्या एका कंपनीने असे पेन बनवले आहे ज्याने कागदावर रेघोट्या मारल्या तर त्या रेषांतून विद्युत प्रवाह सुरू होतो. जपानची विद्युत उपकरणे बनवणारी कांडेको कंपनी आणि टोकियो विद्यापीठ या दोघांनी एकत्रितरित्या हा पेन बनवला आहे. या पेनाच्या शाईत खास प्रकारचे विद्युत प्रवाह करणारे कण वापरले आहेत. तसेच या पेनाचा वापर करण्यासाठी खास प्रकारच्या कागदाचाही वापर केला गेला आहे. सर्किट बनवण्यासाठी या पेनाचा वापर केला जात आहे. कंपनीने या पेनाचा व्हीडिओ देखील प्रदर्शित केला आहे. ज्यात पेनाने ओढलेल्या रेषा जोडून छोटे बल्ब कसे पेट घेतात हे दाखवले आहे. या पेनाने कागदावर ओढलेल्या रेघोट्या खोडण्यासाठी विशिष्ट प्रकराचा खोडरबर देखील बनवला आहे. आतापर्यंत थ्रीडी पेन, मॅजिक पेन असे अनेक प्रकारचे पेन बाजारात आले आहेत पण हे पेन नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2016 रोजी प्रकाशित
VIDEO : ..या अत्याधुनिक पेनाने दिवे उजळले !
या पेनातील शाईतून विद्युत प्रवाह कार्यरत होतो
Written by लोकसत्ता टीम
Updated:

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-08-2016 at 20:39 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pen which conducts electricity on paper