हरियाणामधील रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत चक्क रुग्णालयातील शिपाई रुग्णाला टाके घालताना दिसत आहे. रुग्णाच्या नातेवाईकाने हा व्हिडीओ शूट केला असून यामध्ये शिपाई हाताला टाके घालत असल्याचं दिसत आहे. रुग्णाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हा प्रकार सुरु होता तेव्हा डॉक्टर तिथेच उपस्थित होते, मात्र त्यांनी थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. ही घटना 10 नोव्हेंबर रोजी घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुग्णाने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, एकदा तपासणी केल्यानंतर डॉक्टर पुन्हा आलेच नाहीत. ‘माझ्या हातातून सतत रक्त वाहत होतं पण मला कोणतंही पेनकिलर देण्यात आलं नाही. चौथी शिकलेला शिपाई आला आणि त्याने माझ्या हाताला टाके घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी डॉक्टर तिथेच बाजूला बसले होते’.

‘टाके किती चांगल्या पद्धतीने घालण्यात आले याबाबत मला खात्री नाही, मात्र अद्यापही तिथे वेदना होत आहेत. जेव्हा मी दुसऱ्या एका डॉक्टरांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी टाके योग्य पद्धतीने घातले आल्यात नसल्याचं सांगत माझी मलमपट्टी केली’, अशी माहिती रुग्णाने दिली आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी एमबीबीएसच्या जागा दुपटीने वाढवत असल्याचं सांगितलं आहे. तसंच जेव्हा कधी अशा घटना समोर येतात तेव्हा तात्काळ कारवाई केली जाते असंही त्यांनी सांगितलं.

‘आम्ही वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवत आहोत. डॉक्टरांची संख्या वाढवण्याची गरज आहे. जेव्हा २०१४ मध्ये आम्ही सत्तेत आलो तेव्हा एकूण ७५०० जणांनी एमबीबीएससाठी प्रवेश घेतला. हा आकडा यावर्षी दुपटीने वाढला आहे. पण एक डॉक्टर तयार होण्यासाठी पाच ते सात वर्ष लागतात. यामुळे जितके जास्त डॉक्टर मिळतील तेवढ्या समस्या कमी होतील’, असं मनोहरलाल खट्टर बोलले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peon put stitches in haryana hospital