आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा माज करु नये असं म्हणतात. मात्र चीनमध्ये व्हायरल होत असणाऱ्या सोशल नेटवर्किंग ट्रेण्डमध्ये अनेकजण आपली संपत्ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. या नव्या व्हायरल चॅलेंजचे नाव आहे ‘फ्लॉण्ट यूआर वेल्थ’ म्हणजेच तुमची संपत्ती मिरवा.
चीनमध्ये सध्या व्हायरल झालेल्या चॅलेंजमध्ये मजेशीर फोटो शेअर केले जात आहेत. या फोटोमध्ये तुम्ही खूप श्रीमंत आहात असा दाखवणारा फोटो काढायचा आणि तो शेअर करायचा. मात्र हा फोटो काढताना तुम्ही एखाद्या गाडीमधून बाहेर येताना जमीनीवर पडलात असं भासवणारा हा फोटो हवा ही अट आहे.
View this post on Instagram
‘न्यूजवीक’च्या एका वृत्तानुसार चीनमध्ये १० लाखहून अधिक नेटकऱ्यांनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. चीनमधील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट असणाऱ्या विबोवर अनेकांनी हे चॅलेंज पूर्ण केल्याचे फोटो पोस्ट केले आहे. मात्र आता चीनमधील या चॅलेंज ट्रेण्डने इन्स्टाग्रामवरुन पाश्चिमात्य देशांमधील नेटकऱ्यांना भूरळ पाडली आहे. अनेकजण इन्स्टाग्रामवर या चॅलेंजच्या माध्यमातून आपली संपत्ती मिरवाताना दिसत आहेत. मुळात अशाप्रकारचा एक ट्रेण्ड अमेरिकेमध्ये याआधीच येऊन गेला आहे. फॉलिंग स्टार्स #fallingstars किंवा फॉलिंग स्टार्स २०१८ #fallingstars2018 नावाने असेच चॅलेंज अमेरिकेत लोकप्रिय झाले होते. यामध्ये खाजगी जेट विमानातून उतरताना तुम्ही पडलात अशा पद्धतीचे फोटो नेटकऱ्यांनी पोस्ट केले होते. अगदी मीस युक्रेन ठरलेल्या कॅथेरीन रोम्सनेही हे #fallingstars चॅलेंज पूर्ण करत फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. एकूण ३५ हजारहून अधिक जणांनी हे चॅलेंज पूर्ण केले होते.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
त्यामुळेच भविष्यात अशाप्रकारे श्रीमंती दाखवायचे हे चॅलेंज आईस बकेट चॅलेंज किंवा नो शेव्ह नोव्हेंबरसारख्या चॅलेंजप्रमाणे भारतीयांमध्ये लोकप्रीय झाल्यास आश्चर्य वाटायला नको.