न्यूयॉर्क शहरात असलेल्या गुगेनहेम संग्रहालयात सप्टेंबर महिन्यात सोन्याचा कमोड बसवण्यात आला होता. विशेष म्हणजे प्रदर्शनासाठी नाही तर सार्वजनिक वापरासाठी हा कमोड खुला करण्यात आला होता. संग्रहालय पाहण्यासाठी आलेली कोणतीही व्यक्ती विनामूल्य या कमोडचा वापर करु शकते पण शनिवारी मात्र या कमोडचा वापर करण्यासाठी लोकांनी चक्क लांबलचक रांग लावली होती त्यामुळे या सोन्याच्या कमोडची चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर रंगली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सप्टेंबर महिन्यात १६ तारखेला हा कमोड सार्वजिनिक वापरासाठी खुला करण्यात आला होता. तेव्हापासून हा सोन्याचा टॉयलेट पाहण्यासाठी लोकांनी या संग्रहालयात गर्दी केली होती. शनिवारी ‘वर्ल्ड टॉयलेट डे’ साजरा करण्यात आला आणि याच दिवशी हजारो लोकांनी या टॉयलेटचा वापर करण्यासाठी संग्रहालयात चक्क दोन दोन तास रांगा लावल्या. इटलीचे प्रसिद्ध आर्टिस्ट मौरिजियो कैटिलेन यांनी हा सोन्याचा कमोड तयार केला आहे. १८ कॅरेट सोने वापरून बनवण्यात आलेल्या या कमोडची किंमत ६ ते ७ कोटींच्या आसपास असल्याचे म्हटले जात आहे. या संग्रहालयाला भेट देणारी कोणतीही व्यक्ती या कमोडचा वापर करू शकते. या संग्रहालयाची तिकीट १ हजारच्या आसपास आहे. गुगेनहेम संग्रहालयाच्या चौथ्या मजल्यावरील रेस्ट रुममध्ये हा सोन्याचा कमोड ठेवण्यात आला आहे. पुरुष आणि महिला दोघेही हे शौचालय वापरू शकतात.

या सोन्याच्या संग्रहालयातील कमोडला कोणतीही हानी पोहचू नये यासाठी चक्क सुरक्षा रक्षक या शौचालयाच्या बाहेर तैनात करण्यात आले आहेत. तसेच याची स्वच्छतेचीही काळजी घेण्यासाठी सफाई कामगार नेमण्यात आले आहे.