अनेक रेल्वे स्नेशनवर लोकांच्या सोयीसाठी सरकते जिने बसवले आहेत. आता शहरी भागातील लोकांना मॉल कल्चरमुळे फार पूर्वीच सरकत्या जिन्यांची ओळख झाली. पण जिथे लोकांनी सरकते जिने कधी पाहिलेच नाही अशा ठिकाणी ते बसवले तर बिचाऱ्या लोकांची काय अवस्था होते हे दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होत आहे.
कानपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने बसवण्यात आले पण दुर्दैवानं अनेकांना ते वापरायचे कसे हेच माहिती नाही त्यामुळे लोकांची फजिती होत आहे. सरकत्या जिन्यावरून काही प्रवाशी उलट्या दिशनं उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. असं करणं धोकादायक असू शकतं याचीही कल्पना अनेकांना नाही. त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं या जिन्यांचा वापर करणाऱ्या प्रवाशांचा वेळीच रोखा असं आवाहन केलं जात आहे.