Viral video: सोशल मीडियावर कधी काय समोर येईल हे सांगता येत नाही. सध्या तर एक अतिशय विचित्र आणि हसायला लावणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. फुकट तिथे प्रकट अशा लोकांची भारतात कमी नाही. अशाच फुकट्या लोकांनी भजी खाण्यासाठी अशी गर्दी केली की लोकांनी चक्क उकळत्या तेलात हात घालून भजी पळवल्या आहे. भजी खाण्यासाठी लोक अक्षरश: तुटून पडले होते. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. या जगात वेवगेवगळ्या प्रकारची लोक आहेत. काही जगण्यासाठी खातात तर काही खाण्यासाठी जगतात. आता हे लोक कोणत्या कॅटेगीरीमध्ये येतात हे तुम्हीच सांगा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या गर्दीसमोर भजी बनवणारी मंडळीही हतबल झालेली पाहायला मिळत आहेत. लोक अक्षरश: तेलाच्या कढईच्या जवळच जाऊ उभे आहेत. तेल उडेल, आपल्याला भाजेल याची काहीही भीती त्यांना नाही. भजी बनवणारे आचारी त्यांना थांबा थांबा सांगत आहेत. मात्र कुणीही एकायला तयार नाहीये. कधी भजी कढईतून बाहेर काढताय आणि कधी ताव मारतोय यासाठी सगळ्यांनी अचाऱ्याला घेरलं आहे.

या व्हिडीओवर मजेशीर कॅप्शनही लिहिलं गेलंय. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, असं करण्यापेक्षा सर्वांनी कढईतच बसून घ्यायला हवं होतं. तसेच अन्य नेटकऱ्यांनी देखील व्हिडीओवर भन्नाट कमेंट आणि हसण्याचे इमोजी पाठवलेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जसे कराल तसे फेडाल ! कर्माचे फळ; बघा ६ सेकंदात तरुणासोबत नेमकं काय घडलं…

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @rajat.write या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.