People Caught Mask Robber In The Shop : दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. भरदिवसा दुकानात जाऊन शस्त्राचा धाक दाखवून चोरी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आताही अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारण मास्क घालून दुकान लुटणाऱ्या एका चोरट्याला लोकांनी रंगेहाथ पडकलं आणि दांडक्याने त्याची धुलाई केली. ही घटना अमेरिकेत घडली असून चोरीची घटना कॅमेरात कैद झाली आहे. चोरटा किराना दुकानातील सामान चोरी करत असताना कॅमेराबद्ध झाला आणि धक्कादायक प्रकार समोर आला. दुकानदाराच्या सतर्कतेमुळं चोरट्याचा चोरीचा प्रयत्न फसला आणि त्याला दांडक्याचा प्रसाद मिळाला. चोरट्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

चोरट्याचा हा व्हिडीओ @GabbarSingh नावाच्या ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत पाहू शकता की, एक चोरटा मास्क घालून किराना दुकानात जातो आणि सामान चोरी करून बकेटमध्ये टाकतो. पण तिथे असलेला दुकानदार न घाबरता त्या चोराचा व्हिडीओ काढतो आणि त्याचा पर्दाफाश करतो. त्यानंतर दुकानात शॉपिंगसाठी आलेले दोन व्यक्ती त्या चोरट्याला रंगेहाथ पकडतात आणि त्याची धुलाई करतात. त्या लोकांनी चोराला लाठ्याकाठ्यांनी मारून चांगलाच धडा शिकवल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – वन विभागाच्या गाडीवर हत्तीने केला हल्ला, IFS अधिकाऱ्यांनी शेअर केला जंगलातील थरारक VIDEO

इथे पाहा चोराचा व्हिडीओ

व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्सने भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका यूजरने म्हटलं, कर्माची फळं. दुसरा एक यूजर म्हणाला, या म्हणतात न्याय मिळणं. अन्य एकाने म्हटलं, आम्ही हिंसेचं समर्थन करत नाही. पण हा व्हिडीओ खूप चांगला आहे. रात्री चोरीच्या घटना घडतात, हे अनेक व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे. पण दिवसाढवळ्याही चोरीच्या घटना होत असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरण्याची शक्यता आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहून चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

Story img Loader