तुमच्यापैकी अनेकांना रस्त्यावरून जाणार्या ट्रकचे कर्कश हॉर्न ऐकू आले असतील. काही ट्रकचे हॉर्न इतके भयंकर असतात ते ऐकून भिती वाटते. तर काही हॉर्नचा आवाज इतका मोठा असतो की तेथून जाणार्या लोकांना आता आपल्या कानाचे पडदे फुटतात की काय? असं वाटतं. अशाच ट्रकच्या हॉर्नला कंटाळलेल्या लोकांनी असं काही केलं आहे. जे पाहिल्यानंतर अनेक ट्रक ड्रायव्हर हॉर्न वाजवताना शंभर वेळा विचार करतील यात शंका नाही.
हो कारण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विनाकारण हॉर्न वाजवून लोकांना त्रास देणाऱ्या ट्रकचालकाला लोकांनी चांगलाच धडा शिकवला आहे. शिवाय लोकांनी या ट्रक वाल्याला अशी शिक्षा केली आहे, ज्यामुळे त्याच्या कानाचे पडदे फुटले असतील. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये. एका ट्रक ड्रायव्हरला ट्रकमधून बाहेर काढतात आणि त्याला वाहनाच्या समोर उभं करतात. या वेळी काही लोकांनी तर हातात पूजेचे ताटही घेऊन ड्रायव्हरला ओवाळल्याचंही दिसत आहे.
शिवाय ड्रायव्हर ट्रकसमोर उभा राहताच लोक त्याच्या कपाळावर टिळा लावतात, हे पाहून ड्रायव्हरला खूप आनंद होतो. परंतु या वेळी काही लोक ड्रायव्हरचे डोक पकडून त्याला ट्रकच्या हॉर्नला त्याचे कान चिटकवतात आणि त्याच्याच ट्रकमधील हॉर्न जोरजोरात वाजवतात. हॉर्नचा कर्कश आवाज ऐकून त्याची बिकट अवस्था होते आणि तो हात जोडून लोकांसमोर माफी मागत असल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
या घटनेचा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, “#Public ची कल्पना काय आहे. # ड्रायव्हर ज्यांना हॉर्नचा मोठा आवाज आवडतो.” काही तासांपूर्वी शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ हजारो लाोकांनी पाहिला आहे. अनेक नेटकरी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी सर्व राज्यांतील ट्रकचालकांना असा धडा शिकवला पाहिजे, असं म्हटलं आहे.