viral video: तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा लहान मुलांचे असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील किंवा त्यांना असं काही बोलताना ऐकलं असेल ज्याने तुम्ही भावूक झाला असाल. सोशल मीडियावर लहानग्यांच्या पराक्रमाचे अनेक व्हिडीओ फिरत असतात. आपण नेहमी म्हणत असतो ‘मुले देवाघरची फुले’ लहान मुलं किती निरागस असतात, मात्र कधी कधी मोठ्यांनाही लाजवेल असं काम लहान मुलं नकळत करुन जातात. बऱ्याच वेळा आपल्याला मुलांमध्ये देवाचे अस्तित्व जाणवते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये असेच काहीसे दिसले आहे. ज्यात लोकांनी लहान मुलामध्ये भगवान शिव असल्याचा दावा केला आहे.
निरागस, गोंडस आणि अगदी निर्मळ मनाची ही चिमुरडी अनेक वेळा असं काही तरी बोलतात किंवा करतात की आपण सगळे अवाक् होतो. यांच्यासाठी ना कोणी मोठा ना कोणी लहान, ना कुठली जात, श्रीमंत काय आणि गरीब काय यांच्यासाठी सगळं एक सारखं असतं. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान मूल त्याच्या आईसोबत शिवलिंगाजवळ उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. जेव्हा मुलाची आई शिवलिंगाला जल अर्पण करू लागते तेव्हा मूल ते पाणी आपल्या आईकडून पिण्याचा प्रयत्न करते. जेव्हा आई त्याला पाणी देत नाही तेव्हा मूल बळजबरीने पाण्याला तोंड लावतो आणि ते पिण्यास सुरुवात करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भगवान शिव स्वतः येऊन हे पाणी प्यायल्याचा दावा लोक करत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> दिवसा रिल्स अन् रात्री चोरी! लाखो फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुएन्सर्सना सळई चोरीच्या गुन्ह्यात अटक
हा व्हिडिओ divya kachhawaha नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत ६.८ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. तर ५ लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. यावर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले…हे पाणी प्रत्यक्ष भगवान शिवाने स्वीकारले आहे. दुसऱ्या युजरने लिहिले..भोलेनाथने तुम्ही पाणी स्वीकारले आहे.