काहीजण असे असतात की ते नेहमी गाण्याचे बोल चुकीचे गातात. आता काही काही गाण्यात तर शब्ददेखील असे वापरलेले असतात की, आपल्यालाही ती चूक लक्षातही येत नाही. असं अनेकांच्या बाबतीत होतं. तेव्हा, त्यात काही विशेष नाही. तो शब्द काही का असेना, कोण त्याचा अर्थ, उच्चार शोधत बसतोय? असा कॅज्युअल अॅटिट्यूड अनेकांचा असतो. पण ‘जुडवा २’ चं ‘ऊंची है बिल्डिंग’ जेव्हा लाँच झालं तेव्हा मात्र रसिकांमधला हेर जागा झाला. त्याचं झालं असं की, ‘ऊंची है बिल्डिंग’ गाण्यातील एका कडव्यात ‘मेरे सागरवाले राजा’ अशी ओळ आहे.

आता ‘सागरवाले राजा’चा नेमका अर्थ काय? याचं कुतूहल अनेकांना होतं. बॉलिवूडमध्ये एखाद्या गाण्याचा रिमेक होतो. तेव्हा गाण्याच्या शब्दांमध्ये बदल करण्याचा ट्रेंड काही नवा नाही. पण ट्विपल्सनी मात्र ‘ऊंची है बिल्डिंग’मधल्या ‘सागरवाले राजा’चा अर्थ काय असं विचारायला सुरूवात केली. या गाण्याची गायिका नेहा कक्करला ट्विटमध्ये मेन्शन करून तिला विचारण्यात आलं. पण नंतर तापसू पन्नूनं ट्विट करून ट्विपल्सचा गोंधळ दूर केला आहे. ते ‘सागरवाले राजा’नसून स्वॅगवाला राजा आहे असं ट्विट करून तिनं ट्विपल्सचा गोंधळ दूर केला.

https://twitter.com/ghaalibdanger/status/905958977061748736

Story img Loader