तुम्हीही ९० च्या दशकातील मुलांपैकी एक असाल तर तुम्ही विट्टी दांडू, कॅरम आणि लुडोसारखे खेळ खेळले असतील. पण, स्मार्टफोन्सच्या आगमनानंतर, मुलं या खेळांपासून दूर गेली आहेत आणि अशी अनेक मुलं आहेत ज्यांनी हे खेळ कधीही खेळले नाहीत कारण ते नेहमी PUBG, Temple Run आणि Candy Crush सारखे Live गेम्स खेळतात. अशा परिस्थितीत इंस्टाग्रामवर काही लोक हाताने नारळ फोडण्याचा खेळ खेळताना दिसले. या खेळाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. जर तुम्ही हा व्हिडीओ अजून पाहिला नसेल, एकदा नक्की पाहा. हा गेम जरा धोकादायक आहे, कारण हा खेळ खेळताना जर तुमचे नेम चुकला तर तर खेळाडूचा हातही तुटू शकतो किंवा तळहातावर गंभीर दुखापत होऊ शकते. चला तर मग हा खेळ कसा आहे हे व्हिडिओ पाहून समजून घेऊया…
हेही वाचा – जिद्दीला सलाम! वयाच्या ९२व्या वर्षी शाळेत जाते ही आजी; समाजाला देतेय प्रेरणा, पाहा व्हिडीओ
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, मुलांचा एक गट एकमेकांच्या तळहातावर नारळ ठेवून तो फोडत आहे. प्रत्यक्षात, या खेळांतर्गत, एक व्यक्ती आपल्या तळहातावर एक नारळ धरतो आणि नंतर दुसरी व्यक्ती तो नारळ धरून त्यावरच दुसरा नारळ जोरात मारतो. त्यामुळे तळहातावर ठेवलेला नारळ जोरात फुटतो. तळहातावर ठेवलेला नारळ जर एकदाच जोरात मारल्यानंतर फुटला तर समजून घ्या की, ती व्यक्ती या खेळातील विजेता आहे. खरे तर हा खेळ खूपच जोखमीचा आहे, कारण नेम चुकला तर थेट हाताला दुखापत होते. त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे.
हेही वाचा – तुम्ही केसांना तेल नेहमीच लावता, कधी तूप लावून पाहिले आहे का? केस होतील लांब, दाट आणि मऊ
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ttl.india नावाच्या पेजवरून ३१ ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबतचे कॅप्शन असे लिहिले आहे. नारळ फोडण्याची स्पर्धा, नारळ फोडी. आता हा गेम सोशल मीडियावर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओला आतापर्यं१ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एकाने लिहिले – खरी मजा डोक्यावर नारळ ठेवून फोडण्यात असेल. दुसर्याने लिहिले- प्रत्येक महाराष्ट्रीय लोकांना याची माहिती आहे.