Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही धक्कादायक असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात, की अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धावत्या रेल्वेसमोर लोकं जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
जीव हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. अनेकदा लोकं जीवाची पर्वा न करता वाट्टेल तो धोका पत्करतात. लोकलचे असे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेल. दोन मिनिटे उशीरा घरी जा पण घाई करू नका. अनेकदा तुमची ही घाई तुमचा जीव धोक्यात घालू शकते. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, “घाई वाया जाई”
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका रेल्वे रुळावरुन एक रेल्वे गाडी येताना दिसत आहे. तरीसुद्धा लोकं धावत्या रेल्वेगाडीसमोर रुळावरुन जाताना दिसत आहे. जीव धोक्यात घालून हे लोकं रस्ता क्रॉस करताहेत. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. रेल्वेचाचा वेग कमी आहे त्यामुळे ती हळूवारपणे येताना दिसत आहे.पण लोकं याचा फायदा घेऊन रस्ता क्रॉस करताहेत. खरं तर हा व्हिडीओ पाहून एवढी घाई कशाची असे कुणालाही वाटेल.
हेही वाचा : Video : तुम्ही कधी शाळेतील खिचडी खाल्ली आहे का? व्हिडीओ पाहून ताज्या होतील शाळेच्या आठवणी
युजर्सनी लोकांनी सुद्धा हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. अनेक युजर्सनी असे करणे चुकीचे आहे, असे लिहिलेय.
filsafat_pemula या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “इंडोनेशियातील लोकांना आइन्स्टाइनचा सिद्धांत आधीच समजला होता. त्यामुळे ट्रेनचा वेग पाहून ते निरीक्षण करू शकतात. ट्रेनचा इंजिनचा आवाज, हॉर्न याच्या मदतीने हे लोकं रेल्वे मार्ग ओलांडताना दिसत आहे.”
हा व्हिडीओ आपल्या देशातील नसून इंडोनेशियातील आहे. व्हिडीओच्या कॅप्शन आणि त्यावरील इंडोनेशिया भाषेवरुन तुम्हाला हे समजून येईल.सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.