People Cheering For Chandrayaan 3 Viral Video : भारताने २०१९ मध्ये चांद्रयान-२ मोहिम राबवली होती. परंतु, या मोहिमेत अपयश आल्याने पुन्हा चंद्रावर स्वार होण्यासाठी चांद्रयान-३ श्रीहरीकोटा येथील तळावरून शुक्रवारी दुपारी २.३५ वाजता लॉन्च करण्यात आलं. हे चांद्रयान २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सतधीश धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान अवकाशात झेपावलं. परंतु, देशाचा अभिमान आणि देशावर अतुट प्रेम करणाऱ्या नागरिकांनी चांद्रयान-३ चे लाईव्ह प्रक्षेपण पाहताना एकच जल्लोष केला आणि चंद्रावर पोहोचण्यासाठी चांद्रयान-३ ला भरभरून शुभेच्छा दिल्या. लोकांनी दाखवलेलं देशप्रेम कॅमेरात कैद झालं असून व्हिडीओ ट्वीटरवर तुफान व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काल दुपारी २.३५ मिनिटांनी हे चांद्रयान ३ अवकाश सोडत असताना नागरिकांनी इस्त्रोच्या अधिकाऱ्यांवर स्तुतीसुमने उधळली. इस्त्रोच्या जवळपास असलेल्या एका मैदानात चांद्रयान-३ पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. १० सेकंदाची वेळ राहिली असताना टायमर लावून नागरिकांनी काऊंटडाऊन सुरु केलं आणि चांद्रयान ३ ला चंद्रावर पोहोचण्यासाठी शुभेच्छा दिल्या. भारताने तिसऱ्या चांद्रयान मोहिमेकडे वाटचाल सुरु केली असून संपूर्ण जगाचं यावर लक्ष लागलं होतं.

नक्की वाचा – १९७२ पासून आजपर्यंत चंद्रावर कोणीच का जाऊ शकलं नाही? काय आहे यामागंच कारण, जाणून घ्या

इथे पाहा व्हिडीओ

चांद्रयान-३ असं या मिशनचं नाव आहे. इस्त्रोकडून लॉन्च करण्यात येणाऱ्या या मिशनला पाहण्यासाठी जगभरातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून १४ जुलैला दुपारी २.३५ वाजता चांद्रयान-३ लॉन्च केलं. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅंडिंग करून इतिहास रचण्याचं या मिशनचं मुख्य उद्दीष्ट आहे. ज्यामुळे चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणारा भारत जगभरात चौथा देश बनेल. आतापर्यंत रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनीचा अशी मोहिम राबवली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People crowd cheering for chandrayaan 3 mission you will feel proud to be an india after watching viral video nss