Heard Of Elephants Shocking Video Viral : सोशल मीडियावर एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चार तरुण जंगली हत्तींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी अचानक हत्तींचा मोठा कळप रस्त्याच्या दिशेनं धावत सुटला आणि तरुणांनी पळ काढला. मात्र, हत्तींना डिवचण्याचा प्रयत्न ते पुन्हा करू लागले. त्यानंतर जे काही घडलं ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. भारतीय वन विभागाचे अधिकारी सुसंता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आयएफएस अधिकारी नंदा यांनी तरुणांच्या वर्तणूकीवर संताप व्यक्त केला आहे. नंदा यांनी ट्वीटरवर शेअर केलेली पोस्ट पाहून तुम्हालाही या तरुणांचा राग आल्याशिवाय राहणार नाही.

हत्ती त्यांच्या पिल्लांसोबत रस्ता ओलांडत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्याचदरम्यान काही तरुण हत्तींच्या कळपजवळ जाऊन प्राण्यांचे वेगवेगळे आवाज काढून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत असतात. माणसांचा आवाज ऐकून हत्तींचा गोंधळ उडाला आणि त्यांनी त्यांचा वेग वाढवला. एका तरुणाने तर त्यांच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारचं कृत्य जीव धोक्यात टाकू शकतं, याचाही भान त्या तरुणांना राहिला नव्हता. सुसांता नंदा यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं, “लोकांची वर्तणूक हास्यास्पद आहे. छोट्या पिल्लांसोबत असताना हत्तींचा कळप आक्रमक होऊ शकतो. आपला जीव धोक्यात टाकू नका. त्यांना सुरक्षित रस्ता दाखवा. पहिला अधिकार त्यांचा आहे.”

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
combing operation parabhani
Parbhani : परभणीत रात्री पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन? पोलीस म्हणाले, “परिस्थिती नियंत्रणात आणताना…”
What Prakash Ambedkar Said?
Prakash Ambedkar : परभणी बंदला हिंसक वळण; प्रकाश आंबेडकरांचा इशारा, “२४ तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..”
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
AI camera alerts authorities to halt train near Odisha elephant herd averting major accident video viral
अचानक रुळावर आला हत्तींचा कळप अन्….; पुढे जे घडले ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, Video Viral

नक्की वाचा – जिवंत बिबट्याला दुचाकीला बांधलं अन् थेट रुग्णालय गाठलं, झटापटीत घडलं… थरारक व्हिडीओ व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

पोस्ट शेअर केल्यानंतर जवळपास ५५ हजारांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत आणि लोकांनी या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका यूजरने म्हटलं, “प्राण्यांसोबत अशाप्रकारची वागणूक करणाऱ्यांना अटक केली पाहिजे आणि त्यांच्यावर खटला दाखल झाला पाहिजे. हे तरुण त्यांच्या कुटुंबियांना पाहिल्यावर असेच वागतात का.” दुसऱ्या यूजरने म्हटलं, “सर, या लोकांना तुरुंगात टाकण्यासाठी काहीतरी कारवाई करा”. तिसऱ्या यूजरने म्हटलं, “या बेजाबदार लोकांविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे. तर अन्य एका यूजरने म्हटलं, अशा लोकांवर कारवाई केल्यावरच परिस्थिती बदलेल.”

Story img Loader