टॉक्सिक वर्कप्लेसबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका तरुणीचा कामाच्या ताणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला होता त्यामुळे कामाच्या ठिकाणी असलेल्या टॉक्सिक वातावरणाबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. दरम्यान सध्या एका बॉसच्या पोस्टनंतर पुन्हा एकदा अशीच चर्चा रंगली आहे.

थ्रेडवर एका @quitbytext नावाच्या पेजवर एका बॉसने कर्मचाऱ्याला पाठवलेल्या मेलचा एक स्क्रिन शॉट चर्चेत आला आहे. हा स्क्रिनशॉट व्हायरल झाला आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावर टॉक्सिक वर्कलाइफवरून नवा वाद पेटला आहे.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “तुम्हाला नोटीस द्यावी लागेल असे म्हणत नाही. पण हे त्यांना समजू नये.” मेलमध्ये बॉसने राजीनामा दिलेल्या तीन कर्मचाऱ्यांवर “विचारशील” नसल्याचा आरोप केला आणि सांगितले की,”कर्मचारी एकदाच वेळी कंपनी सोडू शकत नाहीत.”

बॉसने असेही नमूद केले की, “लवकरच एक नवीन नियम लागू केला जाईल, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना राजीनामा देताना तीन महिन्यांची नोटीस देणे आवश्यक आहे आणि हा कालावधी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले कारण प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवातीला समान वेळ घालवले असतो.

हेही वाचा – Ratan Tata Quotes: यशाचे दुसरे नाव आहे रतन टाटा! जाणून घ्या त्यांचे १० प्रेरणादायी विचा

कर्मचाऱ्यांच्या राजीनामा पाहून संतापलेल्या बॉसने केली पोस्ट (सौजन्य – थ्रेड/@quitbytext)

बॉस एवढ्यावरच थांबत नाही. मेलमध्ये पुढे लिहितो की,”त्यांनी इतर धोरणात्मक बदल देखील सादर केले ज्यात कर्मचाऱ्यांच्या आधारभूत वेतनात तीन महिन्यांत $६ प्रति तास कमी करून ते नोटीस कालावधीसाठी खर्च करतील आणि ‘या’ कालावधीत त्यांना त्यांची जागा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल.”

Post by @quitbytext

View on Threads

https://www.threads.net/@beth_goodroe/post/DA3I2jPR4ja

बॉसने इतर कर्मचाऱ्यांसाठी दर आठवड्याला ३० तासांचा “ओव्हरटाईम” देखील सुरू केला आहे जोपर्यंत नवीन नियुक्ती होत नाही आणि नवीन कर्मचारी पूर्णपणे प्रशिक्षित होत नाहीत.

हेही वाचा –१६५ कोटीं खर्च करून पाळीव प्राण्यांसाठी पहिले हॉस्पिटल! प्राणी प्रेमी रतन टाटा यांचा शेवटचा प्रकल्प…

ही पोस्ट वाचून अनेकांना त्यांचे वाईट बॉस किंवा व्यवस्थापकांबरोबर आलेले अनुभव शेअर केले. एका यूजरने लिहिले की, “लोक नोकरी सोडत नाही ते बॉसला सोडून जातात.” त्या व्यक्तीला हे दिसत नाही की समस्या तोच आहे. मी माझी शेवटची नोकरी दीड आठवड्याच्या नोटीससह सोडली, त्यांनी मला सांगितले की,”मी तो माझा शेवटचा दिवस मानू शकते म्हणून मी तसेच केले. ते तुम्हाला पाठीशी घालणार नाहीत, तुम्हाला त्यांची पाठराखण करण्याची गरज नाही.”

दुसर्‍या वापरकर्त्याने त्यांचा अनुभव शेअर करताना लिहिले, “मी फ्लोरिडातील मा‍झ्या बॉसला एका महिन्याची नोटिस दिली आणि तिने मला सांगितले की,”जोपर्यंत त्यांना माझ्याऐवजी दुसरी व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत मी नोकरी सोडू शकत नाही. त्यानंतर ती दोन आठवडे बाहेर होती. मी सांगितलेल्या दिवशी नोकरी सोडत आहे हे सांगण्यासाठी मला मा‍झ्या जीएमकडे (GM) जावे लागले आणि त्याने होकार दिला.”

तिसऱ्या व्यक्तीने कमेंट केली, “कंपन्यांनी भरलेल्या जगात त्यांच्या कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकताना त्यांना कर्मचाऱ्यांबाबत काही वाटत नाही आणि हे कायदेशीररित्या योग्य नाही असा विश्वास ठेवत नाहीत. कायदेशीर अडचणीत येण्यासाठी स्वत:ला तयार करा, हे मला आश्चर्यचकित करते की कंपन्या जर स्वत: एकनिष्ठ नसतात तर ते कर्मचाऱ्यांकडून निष्ठेची अपेक्षा कशी करतात.”