सोशल मीडियावर कुत्र्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कुत्रा हा माणसाचा अतिशय जवळचा आणि प्रिय प्राणी आहे. जो मारणाऱ्यापासून वाचवतो, त्यालाच देव म्हणतात. काही लोक प्राण्यांना मरायला सोडतात; पण काही लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे येतात. भटक्या कुत्र्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कारण- त्यांची काळजी घेण्यासाठी बऱ्याचदा कोणीही मालक नसतो. दरम्यान, असे काही लोक आहेत; ज्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आहे. कुत्र्याचे माणसाबरोबरच्या मैत्रीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
सोशल मीडियावर अनेक वेळा असे व्हिडीओ पाहायला मिळतात; जे आपल्या हृदयाला स्पर्श करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, कुत्रा चुकून जलाशयात पडला आहे. त्या जलाशयाभोवती उतार आहे. अशा परिस्थितीमुळे जलाशयात पडलेला कुत्रा परत बाहेर पडू शकत नाही.
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, जेव्हा कुत्रा जलाशयात अडकलेला असतो, तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या काही प्रवाशांनी तो अडकल्याचे पाहिल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन बचावकार्य करण्याचे ठरविले. कुत्र्याला वाचविण्यासाठी अनेक लोक एकत्र येत मानवी साखळी तयार करताना दिसतात. या लोकांच्या गटामधील एक व्यक्ती खाली येते; तर बाकीचे लोक त्याला वाचविण्यासाठी योजना आखताना दिसत आहेत. त्यानंतर सगळे लोक एकमेकांचा हात पकडून साखळी तयार करून खाली येतात. नंतर सगळ्यात शेवटी असलेली व्यक्ती कुत्र्याला पकडते आणि बाकीचे लोक वर वर जातात. अशा रीतीने सगळ्यांनी मिळून कुत्र्याचा जीव वाचवला, असे या व्हिडीओतून दिसून येत आहे.
(हे ही वाचा : VIDEO: पोत्यातून तांदूळ काढण्यासाठी तरुणाने लढविली अनोखी शक्कल, ‘असा’ जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल )
@pubity या इन्स्टाग्राम हॅण्डलवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सर्वांनी मिळून आपला जीव धोक्यात घालून मानवी साखळी तयार करून कुत्र्याची सुटका केली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाल की, सात-आठ लोक साखळी बनवत आहेत; तर बाकीचे उभे राहून त्यांना पाहत आहेत. एका व्यक्तीने कुत्र्याला गळ्यात हात घालून इतरांच्या मदतीने वर खेचले. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहे.
येथे पाहा व्हिडिओ
या व्हिडीओला आतापर्यंत सहा लाख ३४ हजार लाइक्स आणि आतापर्यंत १४ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एकत्र काम करून माणूस काहीही करू शकतो.” आणखी एका युजरने लिहिले आहे, “सध्या जगात अशा लोकांची गरज आहे.” तिसऱ्या युजरने लिहिले आहे, “जगात अजूनही अनेक चांगले लोक जिवंत आहेत.” असो! हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचे आहे त्याबाबत तुमचे मत कमेंट्समध्ये नोंदवा.