एकीकडे भटक्या कुत्र्यांचा संघर्ष केरळात पेटून उठला आहे. भटक्या कुत्र्यांकडून होणा-या हल्ल्यांमुळे त्रस्त झालेल्या येथल्या काही लोकांनी भटक्या कुत्र्यांना मारून टाकण्याचा सपाटा लावला आहे. तर अलीकडेच भटक्या कुत्र्यांना खाद्य दिले म्हणून पुण्यातील महिला आणि तिच्या आईला शेजा-यांकडून जबर मारहाण करण्यात आली होती. तर गेल्याच महिन्यात वसईमधल्या एका तरुणाने कुत्र्याने गाडीवर लघुशंका केली म्हणून त्याला आपल्या गाडीखाली चिरडले होते असे कितीतरी अमानुष प्रकार आपल्याकडे झाले आहेत. पण भुतदया काय असते हे खरेच इस्तानबुलच्या नागरिकांकडून शिकण्यासारखे आहे. सध्या थंडीचे दिवस आहे. ठिकठिकणी पारा खाली उतरला आहे. कडाक्याच्या थंडीत कितीतरी उबदार वस्त्रे घालूनही थंडीपासून बचाव होत नाही तर तिथे भटक्या कुत्र्यांची काय गत. म्हणूनच या भटक्या कुत्र्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी येथल्या काही नागरिकांनी कुत्र्यांना उबदार चादर पुरवल्या आहेत तसेच त्यांच्या राहण्याची सोयही केली आहे.

वाचा : त्याने ७३५ भटक्या कुत्र्यांना दिले जीवनदान

VIDEO : दोस्त असावा तर असा! तिच्यासाठी दोन दिवस तो रेल्वेरुळावर बसून होता

इस्ताबुलमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. येथील भटक्या कुत्र्यांना थंडीत तग धरून राहणे कठीण होत चालले आहे. अशा वेळी येथील नागरिकांनी रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना ऊब मिळावी यासाठी चादरी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे कार्डबोर्ड किंवा उबदार बॉक्सची सोयही केली आहे. काहींनी या कुत्र्यांना खाणेही देऊ केले आहे. तर उदार दुकानदारांनी देखील आपल्या दुकानाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले केले आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरे तर भटक्या कुत्र्यांमुळे आपल्याला त्रास होतो अशा अनेक तक्रारी आपल्याकडे आहेत. काही अंशी ते खरेही आहे कारण अनेकदा या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकारही घडले आहेत. पण थंडीच्या काळात थोडी भूतदया या प्राण्यांना दाखवली तर नक्कीच कधीतरी ते याची परफेड करतील एवढे नक्की.

वाचा : ‘तिने’ केली त्याच्यासोबत ७०० किमीची पायी तीर्थयात्रा

VIRAL : कुत्र्याच्या समाधीची पूजा करण्याची अनोखी प्रथा

Story img Loader