एकीकडे भटक्या कुत्र्यांचा संघर्ष केरळात पेटून उठला आहे. भटक्या कुत्र्यांकडून होणा-या हल्ल्यांमुळे त्रस्त झालेल्या येथल्या काही लोकांनी भटक्या कुत्र्यांना मारून टाकण्याचा सपाटा लावला आहे. तर अलीकडेच भटक्या कुत्र्यांना खाद्य दिले म्हणून पुण्यातील महिला आणि तिच्या आईला शेजा-यांकडून जबर मारहाण करण्यात आली होती. तर गेल्याच महिन्यात वसईमधल्या एका तरुणाने कुत्र्याने गाडीवर लघुशंका केली म्हणून त्याला आपल्या गाडीखाली चिरडले होते असे कितीतरी अमानुष प्रकार आपल्याकडे झाले आहेत. पण भुतदया काय असते हे खरेच इस्तानबुलच्या नागरिकांकडून शिकण्यासारखे आहे. सध्या थंडीचे दिवस आहे. ठिकठिकणी पारा खाली उतरला आहे. कडाक्याच्या थंडीत कितीतरी उबदार वस्त्रे घालूनही थंडीपासून बचाव होत नाही तर तिथे भटक्या कुत्र्यांची काय गत. म्हणूनच या भटक्या कुत्र्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी येथल्या काही नागरिकांनी कुत्र्यांना उबदार चादर पुरवल्या आहेत तसेच त्यांच्या राहण्याची सोयही केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा