Pune Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा इतिहास, येथील प्राचीन वास्तू, ऐतिहासिक गोष्टी, मंदिरे, संस्कृती नेहमी चर्चेत असतात. येथील खाद्यपदार्थ असो किंवा पुणेरी पाटी नेहमी चर्चेचा विषय ठरतात. पुणेरी माणसं तर जगात कुठेही आपले वेगळेपणा दाखवते. पुण्याची चर्चा सातासमुद्रापलीकडेही दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका पुणेकराने गाडीवर पुणेकर असं लिहिलंय. विशेष म्हणजे ही गाडी पुण्यातील नाही किंवा भारतातील नाही तर चक्क अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील आहे. पुणेकर न्यूयार्कमध्ये सुद्धा त्यांच्या हटकेपणा दाखवायला विसरत नाही. सध्या या गाडीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Video: चालताना फोनवर बोलणाऱ्या वृद्धाचा मोबाईल चोरट्यानं हिसकावला, रस्ता ओलांडताना बसच्या धडकेत मत्यू; CCTV फूटेज व्हायरल!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला चारचाकी गाडी दिसेल. या गाडीच्या मागे नंबरप्लेटवर लिहिलेय, “पुणेकर” या व्हिडीओमध्ये दोन व्यक्तींचा संवाद सुद्धा ऐकू येत आहे.

पहिली व्यक्ती – पुणेकर, ओके. मला माहिती आहे पुणेकर म्हणजे काय?
दुसरी व्यक्ती – पुणेकर म्हणजे काय?
पहिली व्यक्ती – भारतातील एक शहर आहे, महाराष्ट्रातील शहर आहे जिथे मी राहतो.

या दोघांपैकी एकाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पुणेकरांच्या पाट्या किंवा गाडीवरील संदेश सोशल मीडियावर व्हायरल होताना तुम्ही अनेकदा पाहिली असेल पण हे व्हिडीओ पुण्यातील किंवा भारतातील असतात पण वरील व्हिडीओ मात्र चक्क न्यूयॉर्क शहरातला आहे. पुणेकर जिथे जातात तिथे त्यांची वेगळी ओळख निर्माण करत चर्चेत येतात.

पाहा व्हायरल व्हिडीओ, येथे क्लिक करा

हेही वाचा : हातात चहाचा कप अन् ‘त्याचा’ मजेशीर शिंकण्याचा आवाज; VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू; नेटकरी म्हणाले, ‘टॉम आणि जेरी…’

punerispeaks या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनममध्ये लिहिलेय, “न्युयॉर्क शहरात पुणेकर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “महाराष्ट्राची पोर ऐकत नाय राव” तर एका युजरने लिहिलेय, “पुणेकर फक्त पुण्यातच नाहीए, बाकी सगळीकडे आहे, बिहाऱ्या सारखी अवस्था झालीए पुणेकरांची” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला गर्व आहे मित्रा तुझ्या सारखे माणसं आपल्या पुण्याला पुढे नेत आहेत.” अनेक पुणेकर युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People from pune are famous everywhere watch viral video of punekar in new york who wrote on number plate of vehicle ndj