लग्न किंवा एखादा कार्यक्रम असेल तर जेवणाची किंवा नाश्त्याची सोय करण्यात येते. तर जेवणात किंवा नाश्ता करण्यासाठी कितीही चमचमीत पदार्थ टेबलावर ठेवले असतील तरीही गोड पदार्थ खाण्यासाठी लोकांची रांग लागलेली असते. मग ते आईस्क्रीम खाणे असो किंवा गुलाबजामसारखा गोड पदार्थ असो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमात गुलाबजाम खाण्यासाठी लोकांनी रांग नाही तर गर्दी केली आहे आणि जे मिळेल त्यात गुलाबजाम भरून घेऊन चालले आहेत.

व्हायरल व्हिडीओ एका सार्वजनिक कार्यक्रमाचा आहे. एका टेबलावर अनेक पदार्थ मांडले आहेत. तसेच कार्यक्रमात जमलेली माणसं जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत. पण, टेबलावर सगळ्यात शेवटी दोन मोठ्या परातीमध्ये गुलाबजाम ठेवण्यात आले आहेत. तर हे गुलाबजाम घेण्यासाठी लोकांनी रांग न लावता गर्दी केलेली दिसते आहे आणि काही वेळातच गुलाबजाम ठेवलेल्या दोन्ही पराती रिकाम्या झालेल्या दिसत आहेत. कशाप्रकारे गुलाबजाम खाण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली, एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO
poor children collected food
‘जेव्हा पोटातली भूक मर्यादा ओलांडते…’ त्यांनी खरकटं अन्न गोळा करून असं काही केलं… VIDEO पाहून व्हाल भावूक
Anand Mahindra reacts to parent hack video
Anand Mahindra: अहो, थांबा! परदेशी नागरिकाचा ‘जुगाड’ पाहून आनंद महिंद्रा झाले थक्क; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाले, ‘आमचा मुकुट…’

हेही वाचा…चोरीचा डाव फसला! ज्वेलर्समध्ये महिला घुसली खरी पण शेवटच्या क्षणी…पाहा व्हायरल VIDEO

व्हिडीओ नक्की बघा :

पिशवीत, ताटात भरून घेतले गुलाबजाम :

लग्नात बडीशेप किंवा एखादा कटलेटसारखा छोटा पदार्थ आवडला की अनेक जण टिश्यू पेपरमध्ये ठेवून घरी घेऊन येतात, असे मजेदार किस्से तुम्ही ऐकले असतील. पण, इथे तर चक्क मिळेल त्या वस्तू हातात घेऊन त्यात गुलाबजाम परातीतून उचलले जात आहेत. काही जण प्लास्टिकच्या पिशवीमधून, तर काही जण परातीत ताट बुडवून गुलाबजामून घेताना दिसत आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी मजेशीर पद्धतीत गुलाबजाम परातीतून उचलून घेऊन जात आहेत.

तसेच काही सेकंदातच गुलाबजामने भरलेली परात तुम्हाला खाली झालेली दिसेल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @budhwarde या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘मित्रांनो खा, प्या आणि मजा करा’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण पोट धरून हसताना दिसत आहेत; तर काही जण मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच एक युजर म्हणतो आहे की, ही कोणती गुलाबजाम खाण्याची पद्धत आहे; अशा अनेक कमेंट व्हिडीओखाली तुम्हाला दिसून येतील.

Story img Loader