Watch Lion Shocking Viral Videos : जंगलाचा राजा अर्थातच सिंहाचा परिचय देण्याची नक्कीच आवश्यकता नसते. परंतु, आज जागतिक सिंह दिनानिमित्त लोकांना एक महत्वाची माहिती सांगणं गरजेचं आहे. जगभरात सिंहाची संख्या का घटत आहे? यामागे कोणती कारणे आहेत. जसं की ग्लोबल वॉर्मिंग आणि वेगाने नष्ट होणारे जंगल. याच कारणामुळे सिंहांची संख्या हळूहळू कमी होत आहे. सिंहांची मृत्यूचे प्रमाण रोखणे आणि त्यांना दिर्घकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षी जागतिक संघटनेंच्या माध्यमातून जनजागृती अभियान सुरु केलं जातं. दरवर्षी १० ऑगस्ट संपूर्ण जगात जागतिक सिंह दिन म्हणून साजरा केला जातो.
सिंहांच्या बाबतीत लोकांमध्ये जानजागृती वाढवण्यासाठी आजच्या दिवशी सिंहांच्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात. आशिया खंडात सर्वात जास्त सिंह भारतातच आढळतात. आशियाई सिंह भारतात आढळणारी सर्वात मोठी प्रजाती आहे, असं म्हटलं जातं. जागतिक सिंह दिनानिमित्त सोशल मीडियावर ट्वीटरच्या माध्यमातून यूजर्स सिंहाचे एकाहून एक जबरदस्त व्हिडीओ पोस्ट करत आहेत.
इथे पाहा जंगलाच्या राजाचे (सिंहाचे) थरारक व्हायरल व्हिडीओ
२०१३ मध्ये पहिल्यांदा बिग कॅट रेस्क्यूद्वारा जागतिक सिंह दिनाची सुरुवात केली. हा जगातील सर्वात मोठा अभयारण्य आहे. याची सहस्थापना डेरेक आणि बेवर्ली जॉबर्ट यांनी केली होती. ते पती-पत्नी होते. तसंच हे अभयारण्य सिंहांना समर्पित केलं जातं.