पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारांचे सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा ओघ वाढताना दिसत आहे. मोदी यांनी ८ नोव्हेबरला घेतलेल्या निर्णयानंतर सोशल मीडियावर मोदी भक्त आणि मोदी विरोधक यांच्यात सोशलवॉर सुरु आहे. मोदींच्या निर्णयावर उलट सुलट प्रतिक्रियानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटीझन्सनी पंतप्रधानांना अनोख्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे. काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी मोदी सरकारने ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निर्णय मागे घेण्याची सूचना केली होती. तर समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यांनी निर्णयाला स्थगिती द्यावी अशी सूचना केली होती.
यापूर्वी राजकीय वर्तुळातून मिळालेल्या सूचनांपेक्षा सोशल मीडियावरुन मिळणाऱ्या सूचना या हटके आहेत. या सूचना देणाऱ्या नेटीझन्सनी मोदींच्या निर्णयानंतर नोटा फाडून टाकणे किंवा नोटा गंगेमध्ये फेकून देण्याच्या प्रकाराला केंद्रस्थानी ठेवले आहे. चलनातून हद्दपार करण्यात आलेल्या नोटांचा अशा प्रकारे दुरुपयोग टाळण्यासाठी मोदी सरकारने स्वतंत्र खाते उघडून निनावी रक्कम जमा करण्याची मुभा द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. फेसबुकच्या माध्यमातून मिळणाऱ्या या सूचना मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत. निनावी पैसा जमा करणाऱ्यांना जुन्या नोटांच्या बदल्यात कोणतीही रक्कम या योजनेत देऊ नये, असा उल्लेख या सूचनामध्ये करण्यात आला आहे.
५०० आणि १००० च्या नोटा चलानातून बाद करण्याचा निर्णय मोदींनी जाहीर केल्यानंतर सामान्य माणसांपासून ते पैशावाल्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. नोटा घेईना त्यामुळे अनेकांची गैरसोय होत असताना एका हॉटेल मालकाने सामूहिक समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांना औदार्य दाखवल्याचे हॉटेलचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सामाजिका हेतून हॉटेलवाल्याच्या कौतुकाचा वर्षाव केल्यानंतर नेटीझन्स सध्या सोशल मीडियावरील चलनाच्या दुरुपयोग टाळण्याच्या सूचनांचेही स्वागत करताना दिसत आहे.