सोशल मीडियावर कधी कोणत्या गोष्टीचा व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. शिवाय या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही मजेशीर तर काही अंगावर शहारा आणणारे व्हिडीओ असतात. तर काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपल्याला डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका नाल्यात पैसे पडल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय नाल्यात पडलेले पैसे दिसताच ते गोळा करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचंही दिसत आहे.
लोकांनी नाल्यात पडलेल्या नोटा गोळा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीदेखील आश्चर्यकीत व्हाल. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बिहारमधील सासाराम जिल्ह्यातील मुरादाबाद येथील असल्याचं सांगितलं जात आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना नाल्यात पाण्यावर तरंगणारे पैसे दिसल्यानंतर ते गोळा करण्यासाठी लहानापासून मोठ्यापर्यंत अनेकांनी गर्दी केली होती.
@paganhindu नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या ट्विटरधारकाने नाल्यात पडलेल्या नोटा १००, २०० आणि ५०० रुपयांच्या असल्याचा दावा केला आहे. नाल्यात पैसे पडल्याची माहीती परीसरात पसरताच पैशांचे बंडल गोळा करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनेक लोक हातात पैशांचे बंडल घेऊन भिजलेल्या अंगाने नाल्यातून बाहेर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला असून त्यावर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.