पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता इतकी आहे की ते जिथे जातात तिथे त्यांच्या चाहत्यांची गर्दी होतेच. त्यामुळेच हात वर करुन मोदींची अभिवादन करण्याची स्टाइल सर्वपरिचित आहे. रविवारी मोदींनी जम्मूमधील दल लेकमध्ये फेरफटका मारला. मात्र या बोटीमधून मारलेल्या फेरफटक्यादरम्यानही मोदी हात वर करुन अभिवादन करत होते. मात्र ते नक्की कोणाला अभिवादन करत होते हा प्रश्न त्यांच्या दौऱ्यानंतर चौथ्या दिवशीही अनुत्तरितच आहे. नेटवर जम्मू-काश्मीरमधील काही नेत्यांनी यासंदर्भात ट्विट करुन मोदींची फिरकी घेतली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने सोमावरी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान एकदिसीय काश्मिर दौऱ्यावर आले असताना त्यांनी दल लेकमधून फेरफटका मारला असा मजकूर असलेला व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये मोदी बोटीमधून हात वर करुन अभिवादन करताना दिसत आहेत. मात्र हा ६४ सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मोदी कोणाला हात दाखवत आहेत असा प्रश्न उपस्थित केला आहे. बोट चालवणारे काही सैनिक आणि बोट वगळता या व्हिडीओमध्ये काहीच दिसत नाहीय. दल लेकमध्ये फेरफटका मारताना मोदीं बोटीच्या पुढच्या भागात उभे राहून पहाणी करताना दिसतात. त्यांच्या मागे दूरवर झबरवान पर्वतरांगाही दिसत आहेत. मात्र अचानक मोदींनी हात वर करुन अभिवादन करण्यास सुरुवात केली. अनेक स्थानिकांनी या व्हिडीओवर कमेन्ट करुन मोदी कोणाला हात दाखवत आहेत असा प्रश्न उपस्थित केला. ‘दल लेकव आकाराने खूप मोठे आहे. त्यामुळे तलावाच्या काठाशी उभी असणारी व्यक्ती तलावातील बोटीमधून दिसत नाही. तसेच मोदी येणार म्हणून अनेक रस्ते सामान्यांसाठी बंद केले होते त्यामुळे तलावाकाठी असण्याचा प्रश्नच नाही,’ असं स्थानिकांनी ट्विटवर म्हटले आहे. विशेष म्हणजे एएनआयच्या व्हिडीओवरुन मोदी ट्रोल होत असतानाच भाजपानेही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तेथेही अनेकांनी मोदींची खिल्ली उडवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांचा नियोजित दौऱ्या असणाऱ्या परिसरामध्ये समान्यांना प्रवेश देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे दल लेकच्या आजूबाजूला काही किलोमीटरपर्यंतचा परिसर निर्मनुष्य होता असं सांगतानाच मोदी नक्की कोणाला हात दाखवत होते यावर बोलणे पोलिस अधिकाऱ्यांनी टाळले. ‘माणसेच काय इथे तर पक्षांनाही उडण्यास बंदी होती’ असे मत येथील स्थानिक असणाऱ्या बोट मालक संघटनेच्या माजी अध्यक्षांनी नाव न सांगण्याच्या अटीवर नोंदवले. मोदी येण्याच्या दोन दिवस आधीपासूनच दलगेट ते निशतदरम्यानच्या (दल लेकपासून १० किलोमीटरचा परिसर) परिसरात समान्यांना प्रवेशबंदी असताना मोदी कोणाला हात करत होते हा प्रश्न आहे. तसेच मोदींची बोट ज्या दिशेने जात होती त्या बाजूला आत्ता कोणीच राहत नाही अशी माहितीही या व्यक्तीने टेलिग्राफशी बोलातना व्यक्त केले आहे.

स्थानिक आणि इतर नेटकऱ्यांबरोबरच राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री ओमर अबदुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनीही या व्हिडीओवरुन मोदींची फिरकी घेतली आहे. ओमर अब्दुल्लांनी या व्हिडीओचे ट्विट कोट करत, ‘या कॅमेरामनने पंतप्रधानांचा व्हिडीओ शूट करताना खूपच निष्काळजीपणा दाखवला आहे. अनेकजण मोदींना हात दाखवत होते कारण मोदी रिकाम्या तलावाला अभिवादन करणार नाही’ असे उपहासात्मक ट्विट केले आहे.

तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वीपर्यंत भाजपासोबत युती करुन मुख्यमंत्री असलेल्या मेहबुबा मुफ्ती यांनीही या व्हिडीओवरुन मोंदींवर टिका केली आहे. ‘मोदी कोणाला हात दाखवत आहेत असं विचारणाऱ्यांना सांगते की ते काश्मीरमधील भाजपाच्या असंख्य कल्पानिक मित्रांना हात दाखवत आहे.’ असं मुफ्तींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या नेत्यांबरोबरच अनेक नेटकऱ्यांनीही मोदींची या व्हिडीओवरुन चांगलीच फिरकी घेतली आहे. पाहुयात असेच काही ट्विटस

तिथे सुरक्षारक्षक सोडून कोणीच नव्हते

इथे संचारबंदी आहे आणि…

माशांना हात दाखवतायत

कोणाला हात दाखवताय?

वाह मोदी जी वाह

मोदी वेव्ह

तलाव एवढे मोठेय की…

शब्बास

अभिनेता

दरम्यान या आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ हे पुरपरिस्थिती पाहण्यासाठी विमानातून जात असताना त्यांनी विमानाच्या खिडकीतून हात दाखवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. इतक्या उंचीवरुन त्यातही पूरग्रस्तभागातील जनतेला योगी कसे दिसणार असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केलेला.

Story img Loader