आपल्या देशात जुगाडू लोकांची काही कमतरता नाही. रोज सोशल मीडियावर कित्येक जुगाडचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान असाच एक जुगाडू बाईकचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जुगाडू बाईकचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण अशी बाईक तुम्ही आयुष्यात कधीही पाहिली नसेल. कारण या बाईकला दोन नव्हे चार चाक आहेत. विशेष म्हणजे या बाईकचे पुढेचे मागचे टायर एकावर एक चढवलेले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, “एक तरुण त्यांच्या एवढ्या उचं बाईकवर चढतो. दोन लोकांनी ही बाईक पकडून ठेवली आहे. बाईक चालू करतो आणि ही चारचाकी बाईक चालवतो. रस्त्यावरून आरामात बाईक चालवताना दिसत आहे.”
हेही वाचा – आईच्या दुचाकीवरून पडले अन् कारखाली अडकले लहान मुलं! अनोळखी लोक आले मदतीला धावून, ‘असा’ वाचवला लेकराचा जीव
हेही वाचा – धक्कादायक! मटणाच्या नावाखाली लोकांना खायला देत होते ‘मांजराचे मांस’; पोलिसांनी १००० मांजरांची केली सुटका
व्हायरल व्हिडीओमधील जुगाड पाहून लोक थक्क झाले आहे. जुगाडू बाईकचे काहींना कौतूक केले आहे तर काहींनी खिल्ली उडवली. एक जण म्हणाला, “वाहतूक कोंडीमध्ये घेऊन केला तर काय होईल?” दुसरा म्हणाला की, “भाऊ, हे गाडी थांबणार कशी?”