देशातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक Mahindra & Mahindra चे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक व्हिडीओ ते शेअर करतात आणि त्यावर कमेंट करतात. अनेकांना त्यांनी आपल्यापरीने मदतही केली आहे. सोशल मीडियावरचा त्यांचा वावर अनेकांना आवडतो म्हणूनच त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्साह दिसून येतोय. या नवरात्रीच्या निमित्ताने आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तरूणांनी मुंबई मरीन ड्राईव्ह परिसरातच गरबा सादर केलेला दिसत आहे. या व्हिडीओची सध्या प्रचंड चर्चा सुरूय.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील प्रसिद्ध मरीन ड्राईव्हवरील तरुणांच्या एका ग्रूपचा व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “गुजरातमधून माझ्यावर टीका होणार हे माहीत आहे.” असं त्यांनी या कॅप्शनमध्ये लिहिलंय. मरीन ड्राईव्हवर केलेल्या गरबा डान्सच्या व्हिडीओवर आनंद महिंद्रा म्हणाले की, नवरात्रीसाठी मुंबईसारखी जागा कोणतीच नाही. मरीन ड्राईव्ह इथे जमलेल्या तरुणांच्या ग्रुपचा व्हिडीओ ट्विट करून त्यांनी हे लिहिलं आहे. आनंद महिंद्रानी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तरुण सेल्फी काढताना आणि गरब्याच्या गाण्यांवर थिरकताना दिसत आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : दुसरीतील विद्यार्थ्यांचा भेळ बनवतानाचा VIDEO VIRAL; तब्बल १० मिलियन व्ह्यूज

मरीन ड्राईव्हवर तरुणांचा ग्रुप गरबा डान्स करताना दिसला. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मुंबईच्या रस्त्यांवर हे दृश्य टिपले आहेत. हे दृश्य आक्रमक आहेत पण ज्याचे खुल्या मनाने स्वागत केलं जातंय. गुजरातमध्ये नवरात्रीच्या निमित्ताने गरबा आणि दांडिया नृत्याची प्रथा खूप लोकप्रिय आहे.

आणखी वाचा : घराच्या छतावर भूत फिरतंय? VIRAL VIDEO पाहून लोक घाबरले, अखेर सत्य काय?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : म्हशीला चारा दिल्यानंतर मुलगी म्हणाली, “नाच…!” तर पाहा पुढे काय घडलं?

आनंद महिंद्रा यांनी मरीन ड्राईव्हवरील नवरात्रोत्सव पाहिल्यानंतर ट्विट केलेल्या व्हिडीओला २.४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आनंद महिंद्राच्या या व्हिडीओ ट्विटवर सात हजारांहून अधिक लाईक्स आणि ६०० हून अधिक रिट्विट्ससह कमेंट करत आहेत. मरीन ड्राईव्हवर गरबा पाहिल्यानंतर आनंद महिंद्राने ट्विट करून मुंबईच्या रस्त्यांवर विजय मिळवला असल्याचं लिहिलं. ताबा पूर्ण आहे. यानंतर महिंद्राने जे लिहिलं आहे, त्याचा गैरसमज झाला असावा. म्हणूनच त्यांनी शेवटची ओळ लिहिली, मला माहित आहे की मला गुजरातच्या शहरांमधून निषेधाचे आवाज ऐकू येतील!
हा व्हिडीओ ट्विट व्हायरल होताच सोशल मीडिया यूजर्समध्ये प्रतिक्रिया देण्याची स्पर्धा लागली होती. अनेक यूजर्सनी कोलकात्यातील नवरात्री आणि दुर्गापूजा सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे. नवरात्रीच्या काळात गुजरातमधील अनेक शहरांना भेट द्यावी, असे काही ट्विटर युजर्सने सांगितले. गुजरात, अहमदाबाद आणि वडोदरा या शहरांना भेट दिली पाहिजे, असं केयूर नावाचा यूजर म्हणाला, मरीन ड्राईव्हवर गरबा करणाऱ्यांमध्ये किती लोक गुजराती आहेत हे ते सांगू शकतात का? असं देखील विचारण्यात येत आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओ ट्विटवरील कमेंट्समध्ये भारतातील विविधता आणि विविध शहरांमधील नवरात्रीचं वैभव दिसून येतं. लोकांना कोलकातासारख्या शहरांची दुर्गापूजा अतुलनीय वाटते. काहींना गुजरातचा दांडिया आणि गरबा आवडतो, असं सांगण्यात आलं आहे.

Story img Loader