Viral Video : रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आहे. याला लोक कला सुद्धा म्हणतात. भारताच्या वेगवेगळ्या भागात रांगोळीमध्ये वैविध्य दिसून येते. कोणत्याही शुभ प्रसंगी, उत्सव किंवा मंगल कार्यात आवर्जून रांगोळी काढली जाते. घराच्या अंगणात, दाराजवळ, देव घरात, जेवणाच्या ताटाभोवती, तुळशीजवळ अशा अनेक ठिकाणी रांगोळी काढणे शुभ मानले जाते. तुम्ही सोशल मीडियावर रांगोळीचे अनेक व्हिडीओ पाहीले असतील. अनेक जण वेगवेगळ्या हटके रांगोळीचे डिझाइन काढतात. पण तुम्ही कधी विचार केला का की जर परदेशात रांगोळी काढली तर तेथील लोक कशा प्रतिक्रिया देतील?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमेरिकेतली फ्लोरिडा शहरात तरुण तरुणी सुंदर रांगोळी काढताना दिसत आहे आणि त्यांना रांगोळी काढताना तेथील लोक कौतुकाने बघत आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : आई-वडिलांची नाही तर ‘या’ गोष्टीची कृपा म्हणत पठ्ठ्यानं घराला दिलं भन्नाट नाव; PHOTO एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण मुलगा आणि आणि एक तरुणी सुंदर रांगोळी काढताना दिसत आहे. या दोघांना रांगोळी काढताना तेथील लोक कौतुकाने बघत आहे. रांगोळी बघण्यासाठी लोक गर्दी करत आहे. या दोघांनी या रांगोळीतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. या रांगोळीतून तुम्हाला भारतीय संस्कृती दिसून येईल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

art_bhagyashree या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फ्लोरिडा, यूएसएमध्ये रांगोळी काढल्याबद्दल आनंद वाटतो.”
रांगोळी कलाकृतीतून भारतीय संस्कृती आणि परंपरा दिसतेय @mahendra_metkari सह उत्तम फोटोशूटसाठी @dkadlakh धन्यवाद”

हेही वाचा : “दिलात झापुक झूपूक वाजत राहतय ग” महिलांनी केला जबरदस्त डान्स, VIDEO एकदा पाहाच

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सातासमुद्रापार जाऊनही आपल्या संस्कृतीवर रांगोळी” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर रांगोळी काढली आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप अभिमानस्पद गोष्ट ताई. किती खुश होत आहेत सगळे रांगोळी बघायला येणारे…. किती छान आपली मराठी संस्कृती. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ताई” एक युजर लिहितो, “अदभुत कलाकार आहे खरच खूप छान” तर एक युजर लिहितो, “गर्व.. अभिमान.. साता समुद्रा पार जाऊनही आपल्या संस्कृतीवर तितकच प्रेम..खूप छान” हा व्हिडीओ दिड लाखांहून अधिक लोकांना लाईक केला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People perform rangoli art showcasing indian culture in florida usa watch video how people reacted video goes viral ndj