प्रत्येक ऑफिसचे काही नियम असतात आणि या नियमांचं पालन करण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून असते पण वारंवार सांगूनही काही कर्मचारी ऐकत नाहीत. नियम असतातच मोडण्यासाठी असं बोलून सर्रास नियम मोडले जातात. मेनचेस्टरमधल्या ‘कासा सेरॅमिका’ या कंपनीने कर्मचाऱ्यांची एक वाईट सवय मोडण्यासाठी भन्नाट शक्कल लढवली आहे. मुख्य दरवाज्यापासून आत येताना काही कर्मचारी तसेच कार्यालयाला भेट देणारे इतरही लोक धावत आत येतात. वारंवार सांगूनही ते ऐकत नाही. तेव्हा मुख्य दारापासून आतील रस्त्यापर्यंतच्या भागात या कंपनीने टाईल्स बसवल्या आहेत.

Video : सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला तिचा आनंद आणि घट्ट मिठी!

या टाईल्सची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात खड्डा पडला आहे असा भास होईल आणि खड्डा चुकवण्यासाठी तो हळू चालत आत येईल. ऑप्टिकल इल्यूशन तंत्रज्ञानामुळे अशा प्रकारचा भास कंपनीने तयार केला आहे.  याआधीही अनेक देशांत रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि गाड्यांचा वेग कमी करण्यासाठी ऑप्टिकल इल्यूशन तंत्राचा वापर करण्यात आला होता. रस्त्यात खड्डा पडला आहे किंवा रस्त्याला तडे गेले आहेत अशा प्रकारचं ऑप्टिकल इल्यूशन तयार करून चालकाच्या वेगाला मर्यादा लावल्याची अनेक उदाहरण आहेत.

FIFA U17 : गोलकीपर धीरजच्या पालकांचा फुटबॉल खेळण्यास विरोध होता कारण…

Story img Loader