रेल्वे रुळावर निष्काळजीपणे उतरणाऱ्या नागरिकांचे फोटो व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर रेल्वे अपघाताच्या अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. रेल्वे विभागाने वारंवार सुचना देऊनही काही लोक ऐकत नाही आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. दरम्यान, सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबईतील माहीम जंक्शन रेल्वे स्थानकावर लोकल रेल्वेच्या रुळांवर चुल मांडल्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मुंबई मॅटर्स नावाच्या अकांऊटवर X वर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओवर मुंबई विभागाच्या मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.
24जानेवारी रोजी शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये “माहीम JN येथे रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान,” असे लिहिले आहे. व्हिडिओमध्ये काही महिला रेल्वे ट्रॅकवर जेवण बनवताना दिसत आहेत तर काही मुलीही अभ्यास करताना दिसत आहेत. तसेच, मुले आजूबाजूला धावताना दिसत तर काही लोक रुळांवर झोपलेले देखील दिसले. “धोकादायक” असे म्हणत लोकांनी कमेंट केल्या आहे. रेल्वे विभागाकडून त्वरित कारवाईची मागणी केली जात आहे.
हेही वाचा – Video : डोळे बारीक करून पहा होईल प्रभू राम यांचे दर्शन? श्रीराम मंदिराच्या रचनेतील Optical Illusionची कमाल!
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी आपला संताप व्यक्त केला. व्हिडिओला १८लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. माहीमच्या नागरिकांनी कारवाईसाठी त्यांच्या प्रभागाला पत्र द्यावे, असे एकाने सांगितले. “खूप धोकादायक, कोणीतरी कृपया त्यांच्यावर कारवाई करा.” असे एकजणाने लिहिले “तात्काळ कारवाई करावी,” असे दुसऱ्याने सांगितले.
या पोस्टवर प्रतिक्रिया देताना मध्य रेल्वेच्या डीआरएमने मुंबई मध्य पश्चिम रेल्वेच्या डीआरएमला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यांनी हे प्रकरण रेल्वे संरक्षण दलाच्या मुंबई मध्य विभागाकडे पाठवले. काही लोकांनी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली.