Viral Video : पुणे हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची विशेष ओळख आहे. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे बघायला दुरवरून लोक येतात. महाराष्ट्राची संस्कृती जपणारे हे शहर आहे. येथील गणेशोत्सव संपूर्ण देशात लोकप्रिय आहे. ढोल ताशा तर पुणेकरांची ओळख आहे.

आता काही दिवसांवर गणेशोत्सव आहे. त्यामुळे पुण्यात सगळीकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. गणेशोत्सवाची चाहुल लागताच ढोल ताशांचा आवाज कानावर पडू लागतात. पुण्यात ठिकठिकाणी अनेक ढोल ताशा पथक सराव करताना दिसून येतात. अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ढोल ताशा च्या सरावाचा त्रास होणाऱ्या लोकांसाठी एका तरुणाने एक संदेश लिहिला आहे. काय संदेश लिहिला आहे, जाणून घेऊ या.

हेही वाचा : ‘मला लगीन करावं पाहिजे…’ लग्नासाठी मुलगी मिळेना म्हणून पठ्ठ्याने चक्क बाहुलीबरोबर केलं लग्न, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “शेवटचा पर्याय”

या व्हिडीओमध्ये तुम्हा एक ढोल ताशा पथक सराव करताना दिसेल. काही लोक हा सराव बघायला आले आहे. एका तरुणाने एका छोट्या नोटवर एक संदेश लिहिला आहे. त्याने लिहिलेय, “ज्यांना आमच्या ढोल ताशाच्या सरावाचा त्रास होतोय, त्यांनी पुणे सोडून द्यावं!”
ढोल ताशाच्या आवाजामुळे अनेक स्थानिक लोक त्यांना त्रास होतो, अशी तक्रार करतात. त्या लोकांना उद्देशून तरुणाने हा संदेश लिहिला आहे. तरुणाने लिहिलेला हा संदेश सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांकडून फळं, भाज्या खरेदी करताय? मग फसवणुकीचा ‘हा’ Video पाहा, तुम्हालाही बसेल धक्का

x_royal_vadak_x या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सगळीकडे तेच आहे भावा… आमच्यासोबत पण तेच होते… ढोल ताशा हा आता नाही तर ती आपली संस्कृती, परंपरा आहे… ” तर एका युजरने लिहिलेय, “वादक आम्ही पण आहोत पण स्वतःचा आनंदासाठी कोणाला त्रास नाही दिला आज पर्यंत.. सराव आमचा पथकाची पण होते पण अशा जागी जिथे वस्ती कमी आहे.. काही वयस्कर लोक तर काही नुसतीच जन्मलेली मुले असतात ज्यांना हा आवाज सहन होण्यासारखा नसतो.. म्हणून काळजी घ्या.” आणखी एका युजरने लिहिलेय, “नाशिकला पण जे बाहेरून आलेले आहेत त्यांना जास्त त्रास होतो आणि नाशिककर सपोर्ट करतात..”