दिल्लीमधील श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आणि श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस मृतदेहाचे ३५ तुकडे करुन निघृण हत्या करण्यात आलेल्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. एकीकडे या प्रकरणाची नवीन माहिती समोर येत असतानाच देभरातून संताप व्यक्त होत असतानाच दुसरीकडे काही कंटेट क्रिएटर या संवेदनशील प्रकरणावरुन कंटेट तयार करण्याच्या नादात प्रकरणाचं गांभीर्य विसरलेत की काय असा प्रश्न पडावा असं वर्तन करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नक्की पाहा हे फोटो>> “आफताबने मला इतकं मारलंय की…”; ऑफिस मॅनेजरबरोबरचे श्रद्धाचे WhatsApp Chat सापडले! धक्कादायक Insta चॅटही आलं समोर
इन्स्ताग्रामवरील इन्फ्यूएन्सर असलेल्या आरुष गुप्ताने श्रद्धा वालकर खून प्रकरणासंदर्भात तयार केलेलं रील सध्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. एक लाख ७८ हजार फॉलोअर्स असलेल्या गुप्ताने श्रद्धा वालकर आणि आफताब प्रकरणाशी संबंधित रील पोस्ट केलं आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती न घेता गुप्ताने हे रील तयार केलं आहे. आफताब आणि श्रद्धामध्ये काय संवाद झाला असेल अशा अर्थाने हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘दास्तान ए ओम शांति ओम’ हे गाणं वापरुन हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “नॉन-व्हेज खाण्यासाठी आफताब श्रद्धावर बळजबरी करायचा, तिने नकार दिल्यास…”; नवा खुलासा
अनेकांनी या रीलवर आक्षेप घेतला असून गुप्तावर टीका केली आहे. “सर्व गोष्टींकडे कंटेंट म्हणून पाहू नये. जरी या प्रकरणासंदर्भातील जागृती करण्याचा हेतू असता तरी अभिनय न करता तो संदेश देता आला असता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यापेक्षाही ते अधिक संवेदनशील आहे याची जाण असायला हवी,” असं एकाने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: समोर आलं त्या रात्रीचं धक्कादायक CCTV फुटेज! आफताब म्हणाला, “हे श्रद्धाच्या मृतदेहाचे…”
“सर्व काही रिल्ससाठीच आहे ही किती क्रूर मानसिकता आहे. केवळ लाईक मिळाले पाहिजेत,” असं अन्य एकाने म्हटलं आहे. “ही विकृती आहे”, असं अन्य एकाने म्हटलंय. “तू या गंभीर प्रकरणाचं मीम तयार केलं. हे सध्याच्या जगात नॉर्मल असू शकतं कारण मी जुन्या विचारसणीचा आहे,” असा उपहासात्मक टोला अन्य एकाने लगावला आहे. अन्य एकाने गुप्ताला वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. कोण काय म्हणालंय पाहूयात…
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: आफताब सिरीयल किलर? ड्रग्जच्या व्यवसायातही सहभाग? त्याच्या ओळखीतील मुलींचा शोध सुरु
१) लज्जास्पद
२) हा आरोपीचं समर्थन करतोय का?
३) याला वेड्यांच्या इस्पितळात पाठवा
४) अशा प्रकरणांमुळे प्रकरणाचं गांभीर्य संपलं
५) याचंही मीम बनवलं तू…
६) वाईट आहे हे
७) कशा समाजात राहतो आपण
८) निर्ल्लजम
नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “या खुनात आफताबच्या कुटुंबियांचाही सहभाग, आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा…”; श्रद्धाच्या वडिलांचं विधान
दरम्यान, श्रद्धा आणि आफताबच्या नात्यामधील कटूता दर्शवणारे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून आज आफताबची नार्को चाचणी केली जाणार आहे. यामधून बरेच नवे खुलासे होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.