people swept away with Sea Wave : समुद्राची लाट किती धोकादायक असू शकतात याची कल्पना असूनही काही स्वत:चा जीव धोक्यात टाकून पावसाळ्यात समुद्र किनारी जातात आणि आपला जीव गमावतात. पावसाळ्यात समुद्र आणि नद्यांची पातळी धोकादायकरित्या वाढते त्यामुळे अशा स्थितीमध्ये समुद्राच्या जास्त जवळ जाऊ नये किंवा नदीच्या जोरदार प्रवाहाच्या जवळ जाऊ नये अशी सूचना वारंवार केली जाते तरीही काही लोक आपला जीव धोक्यात घालताना दिसतात. सोशल मीडियावर सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये समुद्र किनारी उभे असलेल्या लोकांपैकी दोन जण समुद्राच्या लाटेबरोबर वाहून जात आहेत. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहत आहे.

समुद्राच्या लाटेसह वाहून गेले लोक

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की समुद्र खवळलेला दिसत आहे. दरम्यान काही लोक जीव धोक्यात घालून समुद्राच्या लाटा किनार्‍यावर जिथे येऊन धडकत आहे तिथेच उभे आहेत. अचानक समुद्राच्या लाटा उसळलेल्या दिसत आहे. काही लोक अगदी समुद्र किनार्‍याच्या कठड्यावर उभे आहे. लाट जोरात येऊ किनाऱ्यावर आदळते काही लोक तेथून पळून जातात पण कठड्यावर उभ्या असलेल्यांपैकी दोघे लाटेसह समुद्रात ओढले जातात. लाटेबरोबर ते आत वाहून जाताना दिसत आहे. त्यांचा जीव वाचला की नाही हे व्हिडीओमध्ये पूर्ण दाखवले नाही पण हा व्हिडिओ पाहून समुद्राच्या लाटांपासून दूर राहा हाच बोध या व्हिडीओतून मिळत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर radhekrishna_0555 नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, कृपया पाण्याापासून दूर आहे. हे आयुष्य एकदा मिळते. आपल्या लोकांबरोबर सुरक्षित राहा”

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
Singapore flagged cargo vessel near Colombo beach in Sri Lanka Fact Check
हत्यारं वाहून नेणाऱ्या इस्रायलच्या जहाजाला लागली आग? VIRAL VIDEO चं नेमकं सत्य काय? वाचा, खरी गोष्ट

हेही वाचा – Video : बाईक चोरण्यासाठी चोरट्याने लढवली शक्कल, बॅटिंग करता करता करणार होता चोरी, शेवटी असा फसला त्याचा डाव

हेही वाचा – विनातिकिट एसी कोचमध्ये प्रवास करता होता पोलिस कर्मचारी, टीसीने चांगलेच सुनावले, पाहा Viral Video

समुद्र किनारी जीव धोक्या टाकणाऱ्यांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी समुद्र किनाऱ्यावर उभे राहून जीव धोक्यात टाकणाऱ्या लोकांवर टिका केली. एकाने संतापाने लिहिले, “हे लोक कधीही सुधारणार नाही” दुसरा म्हणाला,”निसर्गासमोर कोणाचेही काही चालत नाही.” तिसरा म्हणाला, पावसाळ्यात किंवा वादळासारखी स्थिती असल्यास लोकांनी दूर राहिले पाहिजे.