People Attacked On Doctor And Police : औरंगाबादच्या (संभाजीनगर) सिडको येथील एम्स रुग्णालयाजवळ लोकांनी राडा केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. रस्त्यावर जमा झालेले लोक डॉक्टरवर हल्ला करत होते. त्यानंतर या गंभीर घटनेबाबत तातडीनं पोलिसांना कळवण्यात आलं. मात्र, काही लोकांनी पोलिसांवरही हल्ला केल्याचं समजते आहे. ही धक्कादायक घटना कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यावर झालेल्या हाणामारीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दखल घेत तीन आरोपींना अटक केलीय. शिवानंद गजानन मोरे, गजानन मोरे आणि विजया गजानन मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

रस्त्यावर लोकांनी राडा केल्यावर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला त्याची कार रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यासाठी सांगितलं. परंतु, त्या व्यक्तीने पोलिसांशी हुज्जत घातली आणि गाडी रस्त्यावरच पार्क केली. धक्कादायक म्हणजे या आरोपींनी पोलिसांवरही हल्ला केला आणि रुग्णालयात आग लावण्याची धमकी दिली. डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Aurangabad Crime : इथे पाहा या घटनेचा थरारक व्हिडीओ

मात्र, मोरे कुटुंबियांनी पोलिसांना मारहाण केली. लोकांच्या गर्दीत या आरोपींनी पोलिसांची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी या तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांना अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People thrashing the cops and doctor near aurangabad cidco aims hospital police arrested 3 culprits shocking video clip viral crime news nss
Show comments