डोंगराळ भागात फिरणे, ट्रेकिंग करणे आणि वॉटर अॅडव्हेंचर करण्याची हौस खूप लोकांना असते. तुम्ही नेहमी पाहिले असेल की लोक गृपमध्ये एकत्र येऊ रिव्हर राफ्टींग किंवा ट्रेकिंग करण्यासाठी जातात. रिव्हर राफ्टिंगची हौस असलेल्या लोकांना हे देखील माहित असते की हे साहस त्यांच्या जीवावर बेतू शकते. पण तरीही लोक रिव्हर राफ्टिंग करण्यासाठी मागे हटत नाही. सोशल मीडियावर रिव्हर राफ्टिंगचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये स्वार लोक अचानक आलेल्या लाटेमुळे बोटीतून बाहेर फेकले गेले.
रिव्हर राफ्टिंगचा व्हायरल व्हिडिओ पाहिला का?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही हे भयावह दृश्य पाहू शकता. व्हिडीओमध्ये तुम्हाला तीन लोक रिव्हर राफ्टिंगची मजा घेताना दिसतील. त्यांच्या बोटीला पुढे असेलेल्या दुसऱ्या बोटीला दोरीच्या सहाय्याने बांधले आहे. पुढे जाणारी बोट जिथे जात आहे त्याच दिशेने दोरीने बांधलेली बोटी देखील जात आहे. पण अचानक वेगात एक मोठी लाट येते ज्यामुळे मागची बोट पलटी होते. बोटीवर स्वार लोक बाहेर नदीत फेकले जातात. व्हिडीओ इथेच समाप्त होतो. या लोक सुरक्षित बचावले की नाही याबाबत कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही.
हेही वाचा – ‘या’ ठिपक्यांच्या फोटोत लपला आहे एक चेहरा? ओळखा पाहू कोण आहे हा स्टार? क्लिक करून नीट पाहा
हेही वाचा – हे काय चाललयं? दिल्ली मेट्रोत पुन्हा सर्वांसमोर KISS करताना दिसलं कपल! Video व्हायरल
हा व्हिडिओ ऋषिकेशचा असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर adventure_rishikesh_2.0 नावाच्या पेजवर शेअर केलेला आहे. या व्हिडीओला२४ हजारपेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे. लोक व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. एकाने लिहले आहे की, ‘बहती हवा सा था वो, कहां गया उसे ढूंढो” ( ही ३ इडियट्स हिंदी चित्रपटातील गाण्याची ओळ आहे.) दुसऱ्याने लिहले की, ‘सर्वजण सुरक्षित असतील अशी प्रार्थना करतो’. तर तिसऱ्याने लिहले की, ‘या सर्वांनी लाईफ जॅकेट परिधान नव्हते केले होते का?’