पूर्वी खेड्यापाड्यात बहुतांश लग्नसमारंभांमध्ये फारशी सजावट केलेली नसायची. पण आता काही ठिकाणी वेगवेगळे बदल पाहायला मिळत आहेत. पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्थाही खाली जमिनीवर केली जायची, पण आता खुर्ची आणि टेबलनी जागा घेतली आहे. पाहुणे आरामात येतात आणि खुर्चीवर बसून जेवणाचा आस्वाद घेतात. पण तरीही गावोगावी अनेक विवाह साध्या पद्धतीने होतात. अशा स्थितीत लग्नात आलेल्या पाहुण्यांना सजावट वगैरेची फारशी माहिती नसल्याने लोक अशी कृत्ये करतात, ज्यामुळे फार हसायला येते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून तुमचे हसू आवरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडिओमध्ये लोक लग्न समारंभात ठेवलेल्या पाण्याच्या कारंज्यात जेवणाची ताटं धुताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्न कार्यक्रम सुरू आहे, ज्यामध्ये पाहुणे सहभागी झाले आहेत आणि ज्याठिकाणी कारंजे सुरू आहेत तिथे लोक आपापली जेवणाची ताट पाण्याने धुताना दिसत आहेत. खरं तर लोकांना कारंजे का बसवले याची कल्पना असल्याचेही दिसत नाही आहे. प्लेट्स आणि ग्लासेस धुण्यासाठी त्याचा वापर केला जात असावा असे त्यांना वाटले. अशा परिस्थितीत लोक न डगमगता कारंज्यात आरामात ताट धुताना दिसत आहेत. लग्नसमारंभात असा घडलेला प्रकार याआधी तुम्ही कधीही पाहिला नसेल.

( हे ही वाचा: घरी बनवलेल्या मटणावरून झालं नवरा बायकोच भांडण; शेजारी मिटवायला आले अन् जे झालं ते भयंकर…)

कारंज्यात प्लेट धुतानाचा व्हिडिओ एकदा पाहाच

( हे ही वाचा: चक्क ‘बजरंगी’ हनुमान यांना पाठवली पाण्याची नोटीस; आता बिल नेमकं भरणार कोण? जाणून घ्या नेमकं प्रकरण)

हा एक अतिशय मजेदार व्हिडिओ आहे, जो @JaikyYadav16 या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शन लिहिले आहे, ‘गावातील लग्नात जास्त सजावट करू नये, शेवटी कारंजे बंद करावे लागले’. अवघ्या २३ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाख ४७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर १३ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People were seen washing plates from water fountain in a village wedding funny video viral on social media gps
Show comments