Viral Video : मनी हाईस्ट (Money heist) ही वेब सीरिज कोरोना काळात खूपच गाजली. या वेब सीरिजमधील पात्रं, त्यांचं राहणीमान, त्यांची चांगल्या माणसांसाठी चोरी करण्याची अनोखी स्टाईल या बाबी अनेक नेटकऱ्यांच्या मनात घर करून राहिल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये वेब सीरिजच्या पात्रांसंबंधित, तसेच मनी हाईस्ट थीमवर अनेक व्हिडीओ, तसेच लग्न समारंभांत डान्स सादर करण्यात आले. आज सोशल मीडियावर मनी हाईस्टची क्रेझ पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. एक अज्ञात व्यक्ती गाडीवर चढून पैसे उडवताना दिसत आहे.
राजस्थानची राजधानी जयपूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सुरुवातीला तुम्हाला व्हिडीओत एक मोठा मॉल दिसेल. तसेच अनेक लोकांची गर्दी या परिसरात जमली आहे. कारण- एक अज्ञात व्यक्ती गाडीवर चढली आहे आणि ती बॅगमधून पैसे काढून रस्त्यावर उडवताना दिसते आहे. पैसे उडवताच आजूबाजूच्या परिसरातील मंडळी रस्त्यावर पडलेले पैसे उचलताना दिसत आहेत. अनेक वाहनचालक हे पाहून रस्त्यावर आपले वाहन थांबवून पैसे गोळा करताना दिसून आले आहेत. मनी हाईस्ट वेब सीरिजच्या पात्राप्रमाणे गाडीवर चढून पैसे उडवणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ एकदा बघाच…
हेही वाचा… VIDEO : पिंजऱ्याची कडी काढून महिलेच्या अंगावर धावले माकड, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
व्हिडीओ नक्की बघा :
मनी हाईस्ट (Money heist) स्टाईलमध्ये रस्त्यावर उडवले पैसे :
मनी हाईस्ट या वेब सीरिजमधील पात्रं चेहऱ्यावर मास्क लावून, लाल रंगाचे कपडे परिधान करून, बँकेमध्ये चोरी करण्यासाठी जायची आणि नंतर ते पैसे गरिबांना वाटायची. अगदी या वेब सीरिजप्रमाणेच जयपूरमध्ये ही अज्ञात व्यक्ती लाल कपडे घालून, मास्क लावून रस्त्यावर पैसे उडवताना दिसून येत आहे. पण, या घटनेमुळे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसते आहे. अर्थातच या वेब सीरिजची क्रेझ कमी होताना दिसत नाही, असे या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @pawangaursahab या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे .’राजकारणीच नाही तर सामान्य जनतेकडेही पैसे आहेत’, अशी कॅप्शन युजरने या व्हिडीओला दिली आहे. मनी हाईस्ट वेब सीरिज प्रथम इंग्रजी भाषेत प्रसारित करण्यात आली होती. त्यानंतर सगळ्या देशांमधून या वेब सीरिजला प्रेम मिळाले म्हणून अनेक भाषांमध्ये ही सीरिज प्रसारित करण्यात आली. म्हणून सर्वत्र याची क्रेझ दिसत आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.