भारतीय रोजच्या वापरातील गोष्टींमध्येही असा काही जुगाड करतात की, त्याला काहीही तोड मिळत नाही. आतादेखील असाच एक जुगाड समोर आला आहे; जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. सध्या उन्हाळ्याचं वातावरण आहे. त्यामुळे शहरी भागापासून ते गावागावात उन्हाळ्याच्या झळा सगळ्यांनाच बसत आहेत. उन्हाळा आला की, सगळीकडे खूप तापतं. अशात कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण घरी महागडे एसी, कूलर विकत घेतो. आता असाच एक नवा जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून सगळेच हैराण झालेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजमाध्यमांवर जुगाडाचे नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये उष्णतेपासून बचाव करण्यासाठी एका व्यक्तीने केलेल्या क्लृप्तीचा नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने आपली खोली थंड करण्यासाठी नवा जुगाड शोधून काढला आहे. त्यामध्ये त्या व्यक्तीने प्लास्टिक ड्रमपासून कूलर बनविला आहे.

व्हिडीओमध्ये त्याने आपल्या कल्पकतेचा वापर करून स्वतःच्या घरी कूलर बनवल्याचे आपल्याला दिसते. त्या व्यक्तीने प्रथम कूलरमध्ये वापरलेला पंखा, गवत आणि मोटार आणली. त्यानंतर कूलरच्या डिझाईनमध्ये ड्रम कापून एका ठिकाणी पंखा बसवला. त्यानंतर उर्वरित ठिकाणी त्याने गवत लावले. त्यानंतर त्यात पाणी टाकता यावे म्हणून ड्रम वरून कापून आतमध्ये मोटार बसवली. त्यानंतर त्याला वायर जोडून घरगुती कूलर तयार करण्यात आला. हा व्हिडीओ समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा : ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी तुम्ही ‘असा’ अतरंगी जुगाड कधी केलात का? व्हायरल व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल )

व्हायरल व्हिडिओ येथे पाहा

इन्स्टाग्रामवर kushal_kanawat_todgarh नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडीओला तीन लाख ९३ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये “ही कला भारताबाहेर जाऊ नये”, असे लिहिले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, “भारतात कलाकारांची कमतरता नाही.” काही वापरकर्त्यांनी त्या व्यक्तीला पंख्यासमोर जाळी लावण्याचा सल्ला दिला आहे. कारण- ते मुलांसाठी धोकादायक ठरू शकते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Person create cooler from drum at home cooler desi jugaad viral video pdb