मेट्रोतून लाखो प्रवासी प्रवास करतात. मेट्रोत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मेट्रोचे काही विशिष्ट नियमसुद्धा आहेत आणि या नियमांचे पालन न केल्यास प्रवाशांना दंड भरावा लागतो. आतापर्यंत तुम्ही दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहिले असतील, पण आज बंगळुरू मेट्रोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यात एक व्यक्ती मेट्रोत ‘कोबी मंचुरियन’ खाते आहे आणि त्याला मेट्रोत खाद्यपदार्थ खाणं चांगलचं महागात पडलं आहे.
व्हायरल व्हिडीओ बंगळुरू मेट्रोतील आहे. मेट्रोत एक व्यक्ती बसली आहे आणि तिच्या हातात कोबी मंचुरियनची प्लेट आहे. मेट्रोत व्यक्ती मजेत कोबी मंचुरियन खाताना दिसते आहे. कोबी मंचुरियन खाणाऱ्या अज्ञात व्यक्तीचे मित्र त्याला असे करण्यापासून थांबवत आहेत. तरीसुद्धा व्यक्ती मुद्दाम मेट्रोत बसून पदार्थ खाताना दिसतो आहे. व्यक्तीचा व्हिडीओ समोर बसलेल्या एका मित्रानेच शूट केला आहे आणि यात व्यक्ती मुद्दाम असे कृत्य करतो आहे, हे स्पष्ट होत आहे. मेट्रोत बसून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…
हेही वाचा… एसटीच्या बसमध्ये आलेला अनुभव सांगत पुणेरी काकांचे पत्र; महामंडळाकडूनही आलं खास उत्तर
व्हिडीओ नक्की बघा :
मेट्रोत ‘कोबी मंचुरियन’ खाणं पडलं महागात :
मेट्रोत पदार्थ खाणे किंवा कोणत्याही वस्तूची विक्री करणे मेट्रोच्या नियमांचे उल्लंघन करण्यासारखे आहे, हे माहीत असूनसुद्धा व्यक्ती मुद्दाम हातात खाद्यपदार्थ घेऊन मेट्रोत बसला आहे आणि हसता हसता खाद्यपदार्थाची चव घेताना दिसत आहे. तर आता अज्ञात व्यक्तीला मेट्रोत मुद्दाम कोबी मंचुरियन खाणं महागात पडले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. तसेच बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) ने अज्ञात व्यक्तीवर कारवाई केली आहे आणि ५०० रुपयांचा दंड भरण्यास सांगितला आहे, असे सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Lolita_TNIE या (एक्स) ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.. व्हिडीओतील व्यक्तीने मुद्दाम असे केले आहे, हे पाहून अनेक जण संताप व्यक्त करत आहेत. काही जण ‘मेट्रोत अशा गोष्टी करणे आता सामान्य झाले आहे’, ‘अशा प्रवाशांवर कारवाई करण्यात यावी’ असे मत मांडताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती, पण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावर बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्यात आली.