Viral video: सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात. जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही असं अनेकदा आपण म्हणत असतो. पण काही व्हिडीओ असे असतात ते पाहून कुठेतरी खरंच माणुसकी अजूनही आहे हे सिद्ध होतं. असाच माणुसकीचं दर्शन घडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका मांजरीच्या रेस्क्यूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मांजरी किती चंचल असतात हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, त्यांना प्रचंड मस्ती करायला लागते. त्या कधीच एका जागी शांत बसलेल्या दिसणार नाहीत, काही ना काही उद्योग त्या करत असतात. अशाच एका मांजरीचा उद्योग समोर आलाय. ही मांजर खेळता खेळता चक्क एका पाईपमध्ये जाऊन अडकली. ही मांजर आकाराने अतिशय छोटा असणाऱ्या एका पापईपमध्ये अडकल्यामुळे तिला बाहेर निघणेही कठीण झाले होते.

माणुसकी शिल्लक आहे

माणसांप्रमाणे प्राणीही अनेकदा अडचणींत सापडतात. मात्र बोलता येत नसल्यामुळे त्यांना मदतीची विनवणीही कोणाकडे करत येत नाही. या दरम्यान एका व्यक्तीमुळे या मांजरीचा जीव वाचला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, या मांजरीला स्वत:चं स्वत: बाहेर पडता आलंच नसतं, कारण ती पूर्णपणे अडकली होती. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीने पाईपमध्ये हात घालून तिच्या शेपटीला खेचून तिला बाहेर काढलंय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ‘शिकार करो या शिकार बनो’, किंग कोब्रा आणि बिबट्या आले समोरा-समोर; पाहा कोण कुणावर ठरलं भारी?

हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे, या व्यक्तीने दाखवलेल्या माणुसकीमुळे मांजरीचे प्राण वाचले अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. mylabthecutest या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओवर प्राणी प्रेमी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.