Viral video: रेल्वे रुळ ओलांडणं जीवावर बेतू शकतं हे माहित असतानाही अनेकदा प्रवासी निर्धास्तपणे रुळ ओलांडताना दिसतात. देशात अनेक ठिकाणी रेल्वे रूळ ओलांडताना दुर्घटना घडतेच. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जरा वेळही थांबायचं नसल्याकारणाने अनेकदा लोकं भरवेगात रेल्वे फाटक क्रॉस करायचा प्रयत्न करतात. पण अशाच वेळीच बऱ्याचदा दुर्घटना घडतात आणि अगदी जीवही जातो.रेल्वे अपघातांच्या बातम्या अनेकदा समोर येतात. कधी रेल्वे अपघात होतो तर कधी रेल्वेने प्रवास करताना एखाद्या व्यक्तीसोबत अपघात होतो. सोशल मीडियावरही असे अनेक व्हिडिओ आहेत, जे पाहून कोणीही घाबरून जाईल. याबाबत अनेकदा रेल्वेकडून जनजागृती मोहीमही राबवली जाते, मात्र तरीही लोक त्याबाबत गांभीर्य दाखवत नाहीत. व्हायरल व्हिडिओ पाहून हे फक्त भारतात होऊ शकतं असं तुम्ही देखील म्हणाल.
सोशल मीडियावर अनेक असे अपघाताचे व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. सध्या असाच एक भयानक आणि हादरुन टाकणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन येणार असते. त्यामुळे फाटकाचे दरवाजे हे आपोआप बंद होतात. यामुळे दोन्ही बाजूकडील लोक फाटकाच्या दरवाजाजवळ थांबतात. मात्र एक व्यक्ती फाटक ओलांडून रेल्वे रुळांच्या शेजारी जाऊन थांबतो. फाटक ओलांडल्यास येणारी रेल्वे जर जलद वेगात असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. मात्र हा व्यक्ती हातात काहीतरी घेऊन सरळ चालतच राहतो, प्रत्येकजण आता काय घडेल, याच विचारात पडले होते आणि काही क्षणात काय होईल, याची सर्वांना भिती वाटत होती.
थोड्यावेळाने ट्रेन येते. मोटारमन या व्यक्तीला पाहून ट्रेन थांबवतो. हे सगळं पाहून आजूबाजूला जमलेले लोक सुटकेचा श्वास घेतात. सर्वांना वाटतं या व्यक्तीचा जीव वाचवा त्यामुळे मोटारमनने ट्रेन थांबवली असेल. तिथे उभा असलेला व्यक्ती हातात पार्सल घेऊन आलेला असतो. मोटारमन त्याला पाहून ट्रेन थांबवतो आणि आपलं पार्सल घेतो.हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> झाडू मारणाऱ्या महिलेच्या अंगावर अचानक पडली धान्यांची पोती, कामगारांनी वाचला जीव; थरारक घटनेचा Video Viral
लोक या व्हिडिओवर कठोरपणे प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले आहे, “ट्रेन कार चालकाला ऑस्कर द्यायला पाहिजे. तर दुसरा व्यक्ती म्हणाला, “अनेक लोकांचे जीवन धोक्यात आणण्यासाठी या व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे.” तर तिसरा व्यक्ती म्हणाला, मोठं नुकसान झालं असतं, तरच या लोकांना कळलं असतं.”