Viral video: रस्त्यावर एका वेळी अनेक वाहने धावत असतात, त्यामुळे ट्रॅफिक जाम पहायला मिळतं. यामध्ये लोकांचा भरपूर वेळ जातो. कधी तर तासनतास ट्रॅफिकमध्ये लोक अडकतात. लोक नेहमीच ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी कोणता ना कोणता पर्याय, जुगाड शोधून काढत असतात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी तरुणानं अनोखा जुगाड शोधून काढला. मात्र, त्याच्यावर ही वेळ का आली हे पाहून तुम्हीही पोटधरून हसाल; तर व्हिडीओ पाहून डोक्यावर हात मारून घ्याल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकीकडे ट्रॅफिक जाम दुसरीकडे वडिलांचे १५ मिस कॉल्स

ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी हा तरुण आपली बाईक चक्क डोक्यावर उचलून घेऊन गेला, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यामागे कारण असं होतं की, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वडिलांचा धाक काय असतो. ठराविक वेळेत घरात नाही पोहचलो तर मग काही खरं नाही, असंच या तरुणासोबत झालं. एकीकडे घरी पोहचायला उशीर झाला, तर दुसरीकडे ट्रॅफिक. अशावेळी तरुणानं हा पर्याय निवडत थेट बाईक डोक्यावर घेऊन ट्रॅफिकमधून वाट काढली आहे. एकीकडे ट्रॅफिक जाम, तर दुसरीकडे वडिलांचे १५ मिस कॉल्स यावेळी तरुणानं असं काही केलं की हा व्हिडीओ पाहून पोटधरून हसाल.

तरुणानं काय केलं पाहा

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे आणि एक व्यक्ती या ट्रॅफिकला कंटाळून आपली बाईक उचलून घेतो आणि ट्रॅफिक पार करू लागतो. हा तरुण आपली गाडी आरामात खांद्यावर उचलून चालत आहे. या व्यक्तीचा हा प्रताप कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा फिरत आहे. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलं आहे की, “वडिलांचे १५ मिस कॉल पडल्यानंतर काय होतं…”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तुम्हीही हॉटेल, बारमध्ये महागड्या ड्रिंक घेता का? पाहा ग्राहकांची कशी होते फसवणूक; पैसे वाचवायचे असतील तर हा VIDEO बघाच

@basit_ki_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून लोकांच्या अनेक कमेंट व्हिडीओवर येत आहेत. अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलं आहे, “वडिलांचा धाक असाच असतो भाऊ”, दुसरा म्हणतो, “वाह, काय डोकं लावलंय.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Person stuck in traffic got bored and ended up doing this video viral on social media srk