भारतात सध्या कडाक्याची थंडी पसरली आहे. या थंडीमध्ये वेगवेगळे गरमागरम पदार्थ खाणे सर्वांनाच आवडतं. परंतु जगभरात अशी अनेक थंड हवेची ठिकाणं आहेत जिथे पाणीच नाही तर खाण्याचे पदार्थसुद्धा गोठतात. तुमचा या गोष्टीवर विश्वास बसत नसला तरीही ही गोष्ट खरी आहे. अमेरिकेत एक व्यक्ती माउंट वॉशिंग्टनवरून सूर्योदय बघता बघता नाश्त्याला नूडल्स खाण्याचा विचार करत होता. परंतु तेथील तापमानाने त्याला नूडल्स खाण्याची परवानगी दिली नसावी. -३४℃ तापमानावर या नूडल्सची अतिशय वाईट अवस्था झालेली होती.
माउंट वॉशिंग्टन वेधशाळेचे ट्विटर हँडल @MWObs वरून ११ जानेवारीला एक फोटो पोस्ट करण्यात आला होता. ‘आमच्या निरीक्षकांपैकी एकाला आज सकाळी ६५+ मैल प्रतितास वेगाने वारे वाहत असलेले क्षेत्र सापडले आहे. त्याने सूर्योदयाच्या वेळी नाश्त्याला उरलेले नूडल्स खाण्याचा विचार केला पण -३०F (-३४℃) तापमानाने त्याला या नूडल्सचा एक घासही खाऊ दिला नाही.’ असे त्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहण्यात आले होते.
Video : ‘हा’ कुत्रा झालाय स्केटिंग मास्टर; सोशल मीडियावर होतेय वाहवाह
या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की हे नूडल्स हवेतच गोठले असून चमचा देखील या नूडल्समध्ये अडकून हवेतच तरंगत आहे. या फोटोला १८३९ लाईक्स मिळाले असून ५५५ जणांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी या फोटोवर कंमेंट्स केल्या आहेत. काही वापरकर्ते म्हणाले आहेत की त्यांना या सुंदर ठिकाणी जायला आवडेल. तर काहींनी हे थंड नूडल्स खावी लागल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. अनेकांनी तर या फोटोचं आणि फोटोग्राफरचं कौतुक देखील केलं.
कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचा साहसी पराक्रम पाहून तुमचाही उर अभिमानाने दाटून येईल
अनेकांनी या फोटोवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने केला हटके जुगाड; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही पडला प्रश्न
नूडल्स आणि अंड हवेतच गोठल्याचा हा फोटो @olegsvn या ट्विटर अकाउंटवर २८ डिसेंबर २०२० रोजी पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर ही गोष्ट सोशल मीडियावर चांगलीच गाजली. या ट्विटला ५७ हजार पेक्षा जास्त लाईक्स मिळाले तर १९ हजार पेक्षा जास्त लोकांनी यावर कंमेंट्स केल्या होत्या. ‘आज माझ्या गावी नोवोसिबिर्स्क सायबेरियामध्ये पारा उणे ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.’ असे त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये म्हटले होते.