सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला एखाद्या गोष्टीबाबत सावध करणारे तर काही पोट धरून हसवणारे असतात. असे विनोदनिर्मिती करणारे व्हिडीओ अधिकाधिक शेअर केले जातात, ज्यामुळे दिवसभराचा ताण कमी करण्यासाठी मदत होते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एअरपोर्टवर पहिल्यांदा आलेल्या माणसाने असे काही केले की ते पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. पाहा नेमकं काय घडलं जाणून घ्या.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक माणूस एअरपोर्टवर आलेला दिसत आहे. तो पहिल्यांदाच एअरपोर्टवर आला असल्याचे व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे. तो चालत पुढे जात असतानाच त्याला सुरक्षा रक्षकांकडुन सामान तपासून घेण्यास सांगतले जाते, ज्यासाठी एक यंत्र तिथे उपस्थित असते. या यंत्रामध्ये समानाची बॅग ठेवायची असते, जी दुसऱ्या बाजुने तपासून बाहेर येते. हे कदाचित या माणसाला माहित नसल्याने तो चक्क स्वतःच त्या यंत्रात बसतो. जेव्हा दुसऱ्या बाजुने तो बाहेर येतो तेव्हा तिथला सुरक्षारक्षकही अचंबित होतो. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा- Video: मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला घडली जन्माची अद्दल; दरवाजाजवळ जाताच काय घडले पाहा
व्हायरल व्हिडीओ:
आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नसेल तर त्याबाबत आपला फार गोंधळ उडतो. असाच गोंधळ या माणसाचा उडाला आणि तो चक्क फक्त सामान ठेवायच्या जागी, स्वतःही जाऊन बसला. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झाले असून, या व्हिडीओला ६४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.