Man Steals Women Underwear: मागील काही दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या घटनांमध्ये पुरुषांनी महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी केल्याचा विचित्र प्रकार उघड झाला आहे. सर्वात आधी बंगळुरूच्या विधान सौधा लेआउटमध्ये एक घटना घडली, जिथे एका पुरुषाला महिलांचे इनरवेअर चोरल्यानंतर टेरेसवर हस्तमैथुन करताना पकडले गेले. दुसरी घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडली, जिथे एका व्यक्तीला परिसरातून अंतर्वस्त्र चोरताना पकडण्यात आले. बंगळुरूच्या महिलांचे इनरवेअर चोरून टेरेसवर अश्लील कृत्य करणाऱ्या इसमाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण घटना CCTV कॅमेर्यात कैद झाली होती, ज्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार संशयित आरोपी भाड्याचे घर शोधत असल्याच्या बहाण्याने या भागात फिरत होता, या इसमाने चोरून अनेक महिलांचे आंघोळ करताना व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. या घटनेनंतर राजगोपालनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात संशयिताचा शोध घेऊन त्याला पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
महिलांची अंतर्वस्त्रे चोरणाऱ्याला अटक, फोन पाहताच…
हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; आरोपी नवाझु करीमला अटक
दरम्यान,अशीच घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. महिलांची अंतर्वस्त्रे चोरणाऱ्या पुरुषाची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, संशयित चोरलेली अंतर्वस्त्रे घेऊन पळून जात असल्याचे दिसून येत आहे. गौसपुरा परिसरातील एका रहिवाशाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली असून, त्यांनी अंतर्वस्त्रांसह पैसेही चोरले असे समजत आहे. तक्रारीनंतर ग्वाल्हेर घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे.