Crocodile attacked video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. सोशल मीडियावर मगरीचे अनेक व्हिडिओ येत असले तरी हा व्हिडिओ वेगळा आणि धोकादायकही आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती मगरीला खायला देण्यासाठी कोंबडी द्यायला गेला मात्र मगरीने व्यक्तीवरच हल्ला केला. हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
असे म्हटले जाते की एखाद्याने पाण्यात मगरीशी लढू नये, विशेषत: भूक लागल्यावर. मगर जितकी मोठी तितकी ती अधिक धोकादायक असते. दरम्यान अशाच एका व्यक्तीनं मगरीला भूक लागलेली असताना तिच्या समोर जाण्याची चूक केली. यावेळी मगरीने आपल्याच मालकावर हल्ला केला. मालक मगरीला खायला देण्यासाठी तलावात पोहोचला असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मगर आपल्या मालकावर हल्ला करताना दिसत आहे. खरं तर काय होतं, एक माणूस मगरीला खायला देण्यासाठी तलावात एक मोठी कोंबडी घेऊन जातो, कोंबडीला पाहून मगर पुढे सरकते पण यावेळी तिची मालकावर पडते. आज मगर चिकन खाण्याच्या मूडमध्ये नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे मगर तिच्या मालकावर हल्ला करते, यादरम्यान मगरीचा मालक स्वत:चा बचाव करण्यासाठी मागे पळतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> तुम्हीही रस्त्यावर तुमची बाईक, स्कूटी पार्क करुन जाता का? हा VIDEO बघून धक्का बसेल; पाहा तरुण थोडक्यात कसा वाचला
एका निर्णयामुळे बचावला
हा व्यक्ती नशीबवान होता की तो तलावाच्या मध्यभागी नव्हता. तो मगरीला चारण्यासाठी तलावाच्या काठावर उभा होता, तेव्हा मगरीने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या याच निर्णयामुळे खरंतर बचावला. अशा स्थितीत तो व्यक्ती ताबडतोब तलावातून बाहेर आला आणि शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या साथीदाराने त्याला ओढले. यानंतर मगर शांत झाली. मगरीच्या जबड्यात एखादी व्यक्ती आली तर त्याचा मृत्यू निश्चित असतो.