एकत्र कुटुंब पद्धतीत राहणं अनेकांना आवडतं. कारण घरात सर्वच सदस्यांचा सहभाग असला की, खेळीमेळीचं वातावरण निर्माण होतं. मग ती जेवणाची वेळ असो वा रात्रीच्या गप्पांची. अशातच जर जवळचे नातेवाईक, मित्र परिवार यांच्या घरी वाढदिवसाची पार्टीचे आयोजन केलं असल्यास एकोपा आणखीनच वाढत जातो. पण, घरातील एखाद्या पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा करायचा झाला तर काहिंच्या कपाळावर आठ्या उठतील. मात्र, याला अपवाद धनबादच्या लोयाबाद येथील एक कुटुंब ठरलं आहे. कारण, जवळपास ३५० पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी एखाद्या माणसाचा नाही, तर चक्क पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अक्षर नावाचा हा कुत्रा इतका नशीबवान आहे की, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या जीवलग मित्रमंडळींनी त्याला सोन्याचे लॉकेट बक्षिस दिले आहेत. या कुत्र्याची वाढदिवसाची जंगी पार्टी कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अक्षर कुत्रा हा साधासुधा नाही, कारण धनबादमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने त्याच्या वाढदिवसाला ४५०० रुपयांचे कपडेही खरेदी केले. कुत्र्याला सोन्याचं, कपड्यांची बक्षिसं तर मिळालीच पण एका महिलेनं या लाडक्या कुत्र्याला चुंबनही केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अक्षरच्या वाढदिवसाला कुटुंबीयांनी भलामोठा केक कापून त्याला भरभरून शुभेच्छाही दिल्या. तसंच त्याच्यासोबत अनेकांनी फोटोसेशनंही केलं.

नक्की वाचा – भारत जोडो यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्करच्या पाऊलखुणा, ट्विट करत म्हणाली, ” राहुल गांधी सर्वांची…”

इथे पाहा व्हिडीओ

अक्षर हा पाळीव कुत्रा आमच्या घरातील एक सदस्य आहे. तो आमच्यासोबतच जेवण करत आणि झोपतो, असं धनबादमध्ये राहणाऱ्या सुमित्रा कुमारी आणि संदीप कुमारी यांनी म्हटलं आहे. मी पंजाब मध्ये काम करायचो. त्याठिकाणी राहणारे लोक कुत्र्यांना कशाप्रकारे वागणूक द्यायचे, ते मी पाहिलं आहे. त्यामुळे प्राण्यांबाबत माझ्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली. आम्हाला २० दिवसांचा एक कुत्रा रस्त्यावर सापडला. त्यानंतर आम्ही त्याला घरी घेऊन आलो आणि आम्ही त्याचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा केला, असंही संदीप म्हणाला.

Story img Loader