एकत्र कुटुंब पद्धतीत राहणं अनेकांना आवडतं. कारण घरात सर्वच सदस्यांचा सहभाग असला की, खेळीमेळीचं वातावरण निर्माण होतं. मग ती जेवणाची वेळ असो वा रात्रीच्या गप्पांची. अशातच जर जवळचे नातेवाईक, मित्र परिवार यांच्या घरी वाढदिवसाची पार्टीचे आयोजन केलं असल्यास एकोपा आणखीनच वाढत जातो. पण, घरातील एखाद्या पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा करायचा झाला तर काहिंच्या कपाळावर आठ्या उठतील. मात्र, याला अपवाद धनबादच्या लोयाबाद येथील एक कुटुंब ठरलं आहे. कारण, जवळपास ३५० पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांनी एखाद्या माणसाचा नाही, तर चक्क पाळीव कुत्र्याचा वाढदिवस साजरा केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अक्षर नावाचा हा कुत्रा इतका नशीबवान आहे की, त्याच्यावर प्रेम करणाऱ्या जीवलग मित्रमंडळींनी त्याला सोन्याचे लॉकेट बक्षिस दिले आहेत. या कुत्र्याची वाढदिवसाची जंगी पार्टी कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा