Pet Dog Waits For Woman On Godavari Bridge Video Viral : आंध्रप्रधेशच्या आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील गोदावरी पूलाजवळ एका महिलेनं आत्महत्या केल्यानं खळबळ माजलीय. परंतु, महिलेलसोबत असलेल्या पाळीव कुत्र्याच्या एका व्हायरल व्हिडीओनं अनेकांचं हृदय पिळवटून टाकलं आहे. कारण घरातील मालकिण पूलावर आल्यापासून गायब झाली आहे, याची जाणीव त्या कुत्र्याला झाली. त्यानंतर या कुत्र्याने महिलेनं ठेवलेल्या चपलेजवळ २२ तास तिची वाट बघत मुक्काम ठोकला. कुत्र्याचा हा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनाही रडू कोसळल्याच्या प्रतिक्रिया इंटरनेटवर उमटत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रिपोर्ट्सनुसार, महिलेनं नदीत उडी मारल्यानंतर ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली. मंदांगी कांचना (२२) असं या मृत महिलेचं नाव असून ती यानम फेरी रोड येथील रहिवासी होती. महिलेच्या आत्महत्येचं कारण तपासलं जात आहे, अशी माहिती यानम पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिली. ही महिला इविनिंग वॉकला जात असताना यानम आणि येदूरलंका याचदरम्यान जीएमसी बालायोगी पूलाजवळ ती अचानक थांबली. त्यानंतर तिने गोदावरी नदीत उडी मारली. त्या ठिकाणी असलेल्या पर्यटकांसमोरच ही धक्कादायक घटना घडली.

नक्की वाचा – CCTV Video: हेल्मेट न घालणाऱ्या चालकाचा जागीच मृत्यू, भरधाव कारच्या धडकेत दुचाकीचा चक्काचूर

इथे पाहा व्हिडीओ

त्यानंतर काही लोकांनी तातडीनं महिलेल्या वाचवण्यासाठी बचाव पथकाला संपर्क केला. पण दुर्देवाने ती महिला पाण्याचा मोठ्या प्रवाहासोबत वाहून गेली. मात्र, तिच्यासोबत असलेला कुत्रा त्या पूलाजवळ तिची वाट बघत राहिला. रात्रभर हा कुत्रा त्या महिलेची वाट बघत होता. मात्र, त्या कुत्र्याला त्याची मालकीण सापडली नाही. त्यानंतप महिलेच्या आईने त्या कुत्र्याला घरी नेलं. हदय पिळवटून टाकणाऱ्या या व्हिडीओनं नेटकऱ्यांनाही भावनिक केलं.